मंठा अर्बन बँकेवर निर्बंधांना मुदतवाढ
जालना
मंठा अर्बन को-ऑप बॅक लि. मंठा या बॅकेस रिझर्व्ह बॅक ऑॅफ इंडियाने बॅकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 चे सेक्शन 35 अ अन्वये दि.13 नोहेंबर 2020 च्या पत्रान्वये दि.16 नोहेंबर 2020 पासुन सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बध लागु केलेले आहेत. या निर्बंधानुसार सर्व ठेवीदार यांच्या ठेवी परत करण्याबाबत निर्बंध आहेत. तथापि ,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दि. 14 मे 2021 च्या आदेशनुसार दि.17 मे 2021 पासुन ते दि.16 ऑगस्ट 2021 पर्यंत पुढील तीन महिन्यासाठी बँकेच्या आर्थिक निर्बंधास मुदतवाढ दिलेली आहे. बँकेच्या सर्व ठेवीदार व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे एस.बी. भालेराव प्रशासक, मंठा अर्बन को-ऑप-बँक लि. तथा सहाय्यक निबंधक (प्रशासन) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
दरम्यान एका वृद्ध महिलेचे मुदत ठेवीचे पैसे परस्पर हडप केल्याप्रकरणी बँकेच्या काही कर्मचाऱ्यांवर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे त्यामुळे आधीच अडचणीत असलेले या बँकेचे खातेदार आणखी अडचणीत सापडले आहेत.