1.
Jalna District

या चार नगरसेवकांच्या प्रभागात निकृष्ट दर्जाची कामे, काँग्रेस मधून भाजपा मध्ये आलेल्या नगरसेविका सौ. देठे यांचा आरोप

जालना- प्रभाग क्रमांक 22 आणि 23 म्हणजेच घायाळ नगर, इन्कम टॅक्स कॉलनी, आदित्य नगर ,हरिओम नगर, सोनल नगर, सुरज नगर ,तुळजाभवानी नगर, नीलम नगर ,या 22 आणि 23 प्रभागांमध्ये दीड ते दोन कोटी रुपयांचे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. आणि या सर्व प्रकाराला गुत्तेदार एम.पी.पवार हे जबाबदार असून त्यांच्यासोबत नगरसेवक देखील जबाबदार आहेत असा आरोप काँग्रेस मधून भाजपा मध्ये आलेल्या याच प्रभागातील नगरसेविका सौ. संध्या देठे यांनी केला आज पत्रकार परिषद घेऊन केला. दरम्यान या रस्त्यांची दुरुस्ती केली नाही तर आपण 26 जानेवारीला विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे उपोषणाला बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या संध्या देठे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला,

काँग्रेस पक्षाचा जरी राजीनामा दिला असला तरी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका पदाचा राजीनामा दिला नाही आणि दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आलेच नाही. पर्यायाने नगरपालिकेत सत्ता काँग्रेसची आणि या भाजपाच्या त्यामुळे यांची गोची होत गेली. काँग्रेसमधून इकडे आल्यामुळे त्याची तीव्रता अधिकच वाढली गेली. गेल्या तीन वर्षांपासून या प्रभागांमध्ये रस्त्याची विविध कामे होत गेली. मात्र आत्तापर्यंत या कामाच्या विरोधात कधीही ब्र शब्द न काढणाऱ्या सौ. संध्या देठे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नगरपालिकेच्या विरोधात विविध आरोप केले. याला कारणही तसेच आहे, 25 डिसेंबर पासून नगरपालिकेवर प्रशासक नियुक्त होणार आहे त्यामुळे अध्यक्षांना पासून नगरसेवकांचा कार्यकाल संपुष्टात येणार आहे, आणि पर्यायाने या नगरसेवकांशी नगरपालिकेचे काही देणे घेणे नाही. म्हणूनच शेवटच्या टप्प्यात का होईना विरोधकांवर टीका करता यावी म्हणून आज ही पत्रकार परिषद घेतली की काय? असाही प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला.

दरम्यान हे काम करणारे गुत्तेदार एम. पी. पवार हे नगरसेवकांचेच गुत्तेदार असल्याचेही त्या म्हणाल्या या दोन्ही प्रभागांमध्ये महावीर ढक्का, शिक्षा देवी ढक्का, किशोर गरदास, आणि सौ. संध्या देठे हे चार नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. तीन वर्षांपासून ही कामे निकृष्ट दर्जाची होत असताना आपण गप्प का राहिलात? या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, मी आत्तापर्यंत अनेक तक्रारी केल्या आहेत, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. यासंदर्भात पत्रकारांनी तक्रारीच्या प्रति मागितल्या असतात त्या उपलब्धही झाल्या नाहीत .त्यामुळे नोव्हेंबर मध्ये त्यांनी आयुक्तांकडे केलेल्या तक्रारींच्या प्रति त्यांनी उपलब्ध करून दिल्याने केवळ कार्यकाल संपत आल्यामुळे त्यांनी हे आरोप केल्याचे मत काही पत्रकारांचे झाले आहे.
या पत्रकार परिषदेला भाजपाचे शहर उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र भोसले, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष एड. गणेश तौर ,कृषी मोर्चाचे शहराध्यक्ष प्रशांत गाडे, बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील भालेराव, भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक सेलच्या जिल्हाध्यक्ष सौ. शुभांगी देशपांडे ,नागरिक पांडुरंग खैरे यांची उपस्थिती होती.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button