साने गुरुजींचा वाढदिवस विविध उपक्रमांनी होणार साजरा

जालना : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा शाखेतर्फे वंदनीय साने गुरुजी जयंतीदिनानिमित्त शुक्रवारी ( ता.२४ ) जिल्ह्यातील विविध शाळांमधून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साने गुरुजी जयंतीनिमित्त कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा,रंगभरण स्पर्धा, कथावाचन,भाषण स्पर्धासह ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हाध्यक्ष डाॅ.सुहास सदाव्रते यांनी दिली आहे.
वंदनीय साने गुरुजी जयंतीदिनानिमित्त शहरातील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयात कवी- कथाकार विक्रम पाठक यांचे कथाकथन होईल. सरस्वती भुवन प्रशालेत कवी प्रा.प्रदीप देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.शहरातील मूर्गी तलाव परिसरातील नगर पालिका प्राथमिक शाळेत उर्दू भाषेत विद्यार्थ्याना कथावाचन करण्यात येणार आहे. शहरातील संभाजीनगर परिसरातील शांतिनिकेतन विद्या मंदिर शाळेत कथावाचन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील अहिल्यादेवी प्राथमिक विद्यालय,महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले आहे.
राणीवाहेगाव ( ता.परतूर ) येथील जिल्हा परिषद शाळेत कथाकथन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.अंबड येथील मस्त्योदरी विद्यालयात मुख्याध्यापक अरविंद देव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात कथाकार विक्रम पाठक यांचे कथाकथन होईल. परतूर येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात शालेय विद्यार्थ्यासाठी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.जामवाडी ( ता.जालना ) येथील रंगनाथराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.श्रीरामतांडा ( ता.मंठा ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. माळतोंडी ( ता.मंठा ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भाषण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सायगाव ( ता.बदनापूर) येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात कथावाचन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. लिंबे वडगाव ( ता.मंठा ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांसाठी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. टेंभुर्णी ( ता.जाफराबाद) येथील जेबीके माध्यमिक विद्यालयात भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.हिवरा राळा ( ता.बदनापूर) येथील राजकुंवर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भाषण स्पर्धा घेण्यात येणार आहेत.सारवाडी ( ता.जालना) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कथावाचन उपक्रम घेण्यात येणार आहे.जिल्ह्यातील विविध शाळेत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कथामालेचे प्रमुख कार्यवाह आर.आर.जोशी,कार्याध्यक्ष जमीर शेख,कोषाध्यक्ष संतोष लिंगायत,उपाध्यक्ष डाॅ.दिगंबर दाते,हेलस शाखा अध्यक्ष कल्पना दत्तात्रय हेलसकर,विजय वायाळ,संतोष मुसळे,संजय शास्त्री,भिवसन ससाणे,सुनील खरात,संजय निकम,सुखदा काळे,शिरीष देशमुख, सचिन जहागीरदार, संतोष जोशी,जगदीश कुडे, रामदास कुलकर्णी, पवन कुलकर्णी,संदीप इंगोले,
मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे,मुख्याध्यापक पंढरीनाथ उनवणे,मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.जिल्ह्यातील विविध शाळांमधून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून साने गुरुजी जयंतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna