ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी रास्तारोको
जालना- स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये संपुष्टात आलेले ओबीसी आरक्षण तात्काळ पूर्ववत करावे या मागणीसाठी आज गुरुवार दिनांक 23 रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थोड्याच वेळात पोलिसांनी हे आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन संपविले .
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे स्थानिक स्वराज्य संस्थे मधील आरक्षण संपुष्टात आले आहे .त्यामुळे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात इम्पेरिकल डेटा देऊन ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत सुरू करावे .स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण गेल्यामुळे या समाजाच्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व मिळविणे कठीण झाले आहे, आणि तो एक प्रकारे या समाजावर अन्याय आहे. हे आरक्षण पूर्ववत झाले नाही तर निवडणूक प्रक्रियेत समाज बहिष्कार टाकेल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
आंदोलनासाठी संतोष विरकर, सुंदर कुदळे, डॉ. विशाल धानुरे, दीपक वैद्य, संतोष जमदाडे, दशरथ तोंडुळे, इंद्रजीत घनवट, अर्चना राऊत यांची उपस्थिती.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna