मंठा पोलिसांनी पकडला 18 लाखांचा गांजा,36 लाखांचा मुद्देमाल जप्त
जालना-मंठा पोलिसांनी कर्णावला पाटीवर आज सकाळी 10 वाजता एका ट्रकवर छापा टाकून 18 लाखांचा 3 क्विंटलगांजा जप्त केला आहे.आंधप्रदेशातील राजमुंदरा येथून जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे हा गांजा येत होता.
मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना मिळालेल्या माहिती नुसार आज सकाळी 8 वाजल्यापासूनच पोलिसांनी सापळा रचला होता.त्या नुसार मंठा ते देवगाव पाटी दरम्यान कर्नाळा पाटीवर एक ट्रक उभा असल्याचे दिसला.प्रथमदर्शनी ता ट्रक मध्ये चिकू,चिंच, आशा प्रकारची मोठी झाडे ठेवली होती.या झाडाच्या आड 12 गोण्या मध्ये प्रत्येकी 12 -13 पुढे गांजाने भरलेली होती.या गांजाची मोजदाद पोलीस ठाण्यात इन कॅमेऱ्यात करण्यात आली.6 हजार रुपये क्विंटल प्रमाणे 3 क्विंटल 7 किलो 280 ग्राम,गांजा जप्त केला आहे.12 गोंन्यामध्ये148 पुडे निघाले आहेत.
या प्रकरणी भोकरदन तालुक्यातील कल्याणी येथील गोविंद हिरालाल चांदा45, आणि त्याचा भाऊ बादल हिरालाल चांदा 35 ,यांना पोलिसांनी ताब्यातघेतले आहे.गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरू आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna