पं. गिरीश गोसावी यांच्या गायनाने संगीत महोत्सवाचा समारोप
जालना जालना तालुक्यातील आनंदगड येथे तीन दिवसीय संगीत महोत्सवाचा सूरमणी पंडित गिरीश गोसावी यांच्या सुमधूर गायनाने समारोप झाला.
ह .भ. प. डॉक्टर भगवान बाबा आनंदगडकर यांचे आनंदगड येथे संस्थान आहे. या संस्थानात गोशाळा, शनी मंदिर,अन्नपूर्णा मंदिर, क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या नावाने तीर्थक्षेत्र, अशा विविध प्रकारच्या अध्यात्मिक आणि सामाजिक बाबी पाहायला मिळतात. त्यामुळे या आनंदगडाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाला आहे. त्यातच ह. भ. प. भगवानबाबा आनंदगडकर यांना नुकतीच “डॉक्टरेट” ही पदवी मिळाली आहे. त्यानिमित्त दिनांक 21 ते 23 दरम्यान येथे तीन दिवसीय पहिला “संगीत महोत्सव” आयोजित करण्यात आला होता.
या महोत्सवामध्ये डॉ. प्रसाद चौधरी, डॉ. सतीशचंद्र प्रभू, ऋषिकांत तौर ,सौ. स्मिता चौधरी ,सौ. स्मिता उदय दडके यांनी आपली गायन सेवा दिली. सूरमणी पंडित गिरीश गोसावी यांच्या सुमधूर आवाजाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पं. गोसावी यांना अंबाजोगाई येथे नुकत्याच पार पडलेल्या संगीत महोत्सवामध्ये जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या गायनाला डॉ. प्रसाद चौधरी, आणि संकेत शार्दुल यांनी तबल्यावर, गजानन केचे यांनी संवादिनीवर, तानपुऱ्या वर गणेश आभाळ तर प्रथम चौधरी आणि ऋषिकांत तौर यांनी ताल वाद्य वाजवून साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवताचार्य प्रणव जोशी यांनी केले. कार्यक्रमाला भगवान महाराज आनंदगडकर यांच्यासह देशपांडे, डॉ. तौर, विलास टेकाळे आणि परिसरातील भाविक आणि रसिक होते उपस्थित.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna