पिंपळखुटा शिवारात सशस्र दरोडा ,महीलांना मारहान करीत ४ लाख १३ हजाराचे सोन्या चांदीचे दागिने लंपास
जालना- जाफराबाद तालुक्यातील पिंपळखुटा शेत शिवारातील राजु खोसरे यांच्या गट नं ४८ मधील शेतातील घरावर चार दरोडेखोरांनी काल मध्यरात्री दरोडा टाकला, घरात घुसुन महिलांना कुऱ्हाड, लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने जबर मारहाण करीत सखुबाई खोसरे यांच्या अंगावरील गहुमन्याची ४५ हजाराची पोत ,१२ हजाराची सोन्याची पोत,३ हजाराचे मनी मंगळसुत्र,६ ग्रँमच्या ३० हजाराच्या सोन्याच्या बाळ्या ,हातातील चांदीचे २४ हजाराचे दोन कडे,तर रंजना गाडेकर यांच्या अंगावरील ४ ग्रँमचे १० हजाराचे मंगळसुत्र,४५ हजाराची गहुमन्याची पोत,२ ग्रँमची सोन्याची मोरणी ५ हजाराची,१८ हजाराचे चांदीचे कडे६ ग्रँम पायातील चांदीचे ३ हजार ६००जोडवे व लताबाई गाडेकर यांच्या अंगावरील ४५ हजाराची एक तोळ्याची गहुमन्याची पोत,कानातील ३० हजाराच्या बाळ्या ७ हजाराची मोरनी,१८ हजाराचे कडे,३ हजार ६००रुपयाचे जोडवे तसेच सुनिताबाई देव्हडे यांच्या कानातील सोन्याचे वेल,सोन्याची फुले,झीने असा एकुण ४ लाख,१३ हजार,२ शे.रुपयाचे सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली.
दरोडेखोरांच्या या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने जालन्याच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.जाफराबाद पिंपळखुटा शिवारात शेतात राहणाऱ्या राजु रामदास खोसरे यांच्या घरातील एका खोलीची कडी लावून दुसऱ्या खोलीत चार ते दरोडेखोरांनी प्रवेश केला. त्यानंतर सखुबाई रामदास खोसरे, रंजना संजय गाडेकर, लता रमेश गाडेकर, सुनीता कैसाल देव्हडे यांना कुऱ्हाड, लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने मारहाण करीत अंगावरील सोन्या चांदीचे दागिने काढुन घेतले. चांदीचे कडवळे, गळ्यातील सोन्याची पोथ, मनी मंगळसुत्र, नाकातील नथ, कानातील सोन्याचे दागिने, यासह घरातील लोखंडी पेटी उचकटुन त्यातील रोख १० हजाराची रोख रक्कम आणि सोन्याची ,अंगठी लंपास केली. असा सुमारे साडेचार लाखांचा
ऐवज दरोडे खोरांनी ल॑पास केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी इंदलसिंग बहुरे, पोलीस निरीक्षक रमेश जायभाये ,उपनिरीक्षक प्रल्हाद मदन,पो.काँ.महेश वैद्य,पो.काँ.राजेंद्र डोईफोडे,पो.काँ.जी.ए.डोईफोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केले. तसेच दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी श्वानपथकला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी सुनिता
कैलास देव्हडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिस अधिक्षक विनायक देशमुख,व उपअधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश जायभाये हे करीत आहेत.
दरम्यान पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांनी घटनास्थळाला भेट देऊन चौकशी केली व सदरील घटनेचा तपास लावण्यासाठी तपास चक्र फिरवणार आहे व आरोपींचा शोध घेऊन जेरबंद करणार असल्याचे यावेळी सांगितले.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna