मराठवाडा

बस तर बंद, वाहक-चालक जातात कुठे? महिला हैराण


जालना
गेल्या दोन महिन्यांपासून बस जवळपास बंदच आहेत. असे असतानाही अनेक वाहक- चालक नित्यनियमाने रोजच्या वेळेप्रमाणे घरून ड्युटीवर चाललो असे सांगून निघतात मात्र ते जातात कुठे? या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्यामुळे महिला वर्ग हैराण झाला आहे.

लॉक डाऊन सुरू झाले आणि बस मधील प्रवासी देखील 50 टक्क्यांवर आले, नव्हे तर पन्नास टक्के देखील प्रवासी बस मध्ये नाहीत. त्यामुळेबस पूर्णता बंद असल्यासारख्या आहेत आणि अत्यावश्यक सेवेसाठी ज्या बस सुरू आहेत त्या बहुतांशी औरंगाबादला जाणाऱ्या आहेत. आशा बसच्या दिवसभरात दोन ते तीन फेऱ्या होतात त्यामुळे प्रवासी वाहतूक पूर्णता बंद आहे. एसटी महामंडळाची मालवाहतूक सुरू आहे ही मालवाहतूक देखील दिवसभरातून दोन ते तीन गाड्या भरून जाते. त्यामुळे ज्या वाहक चालकाची ड्युटी आहे अशांना फोन करून बोलावले जाते आणि दहा दिवसातून एक दिवस त्यांना हे काम आहे. वाहनचालकांची अशी ड्युटी असतानादेखील अनेक वाहक-चालक रोज नित्यनियमाप्रमाणे ड्युटीवर चाललो असे सांगून घरून निघतात मग दिवसभर हे वाहक-चालक जातात कुठे? असा अनेक महिलांना पडलेला प्रश्न आहे .
याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता जालना आगारामध्ये वाहक चालकांसाठी विश्रांती कक्ष आहे आणि या विश्रांती कक्षामध्ये हे वाहक चालक वेळ घालविण्यासाठी नव्हे तर मुद्दामून एकत्र येऊन नको तो टाईमपास करत बसतात. याविषयी आगारप्रमुख श्री. चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले की आम्ही फक्त ज्यांना ड्युटी आहे अशांनाच फोन करून बोलावतो आणि त्यांची देखील दहा दिवसांतून एकदाच एकदाच ड्युटी लावतो, मात्र अनेक वाहक-चालक काही ना काही तरी बहाणा करून आगारांमध्ये येतात, परंतु ते कामानिमित्त येत असल्याचे सांगत असल्यामुळे आम्ही त्यांना बंधनही घालू शकत नाहीत. परंतु ते इथे येऊन काय करतात ,आणि कधी घरी जातात हे मात्र आम्ही पाहू शकत नाहीत. असेही ते म्हणाले. दरम्यान वाहक चालकांच्या पत्नींनी मात्र आगार प्रमुखांनी या प्रकाराला आळा घालावा अशी मागणी केली आहे.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button