Advertisment
जालना जिल्हा

मेगा शिबिरात होणार मोफत शस्त्रक्रिया

जालना- जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, आणि रोटरी क्लब ऑफ जालना च्या वतीने आठ दिवसाचे मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 4 ते 11 जानेवारी दरम्यान या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे, या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी केले आहे.

जालना जिल्ह्यातील जालना, अंबड, आणि घनसावंगी या तीन तालुक्यातील गरजूंसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने इतरही तालुक्यातील गरजूंसाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. या मेगा शिबिरामध्ये पोटाचे विकार, कान, नाक, घसा, डोळ्यांचे उपचार ,दातांचे रूट कॅनल, याच सोबत महिलांच्या गर्भपिशवीच्या ही शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. महिलांविषयीच्या शस्त्रक्रिया आणि उपचार गांधीचमन येथे असलेल्या स्त्री रुग्णालयात केले जाणार आहेत तर उर्वरित सर्व शस्त्रक्रिया या सामान्य रुग्णालयात होणार आहेत. या सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. त्यासाठी गरजूंनी आपली नावे घनसांवगी प्राथमिक आरोग्य केंद्र, अंबड उपजिल्हा रुग्णालय, जालना सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय जालना, येथे नावे नोंदवावीत आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार शस्त्रक्रियेसाठी जालना येथे यावे. अशी माहिती डॉ. अर्चना भोसले यांनी दिली आहे.

*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button