Jalna District

श्री चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात;सुदैवाने जीवित हानी नाही

जालना -नागपूर येथून पुण्याकडे जाणाऱ्या श्री चिंतामणी या  प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसला आज मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अपघात झाला. जालना- मंठा वळण रस्त्यावर रोहनवाडी पाटीजवळ झालेल्या अपघात ग्रस्त बसचा क्रमांक एम एच 12 के.क्यू  4005 असा आहे. नागपूर येथून प्रवासी घेऊन पुण्याकडे जात असताना रात्री अडीच वाजेच्या सुमारास ही बस रोहनवाडी पाटीजवळ गतिरोधकावर आदळली आणि त्यामुळे या बसच्या काचा फुटल्या. काचा फुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि सदरील बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यावर  चढली. सुदैवाने या नाल्याच्या समोर मातीचे ढिगारे असल्यामुळे त्यामध्ये ही बस अडकली, कदाचित हे ढिगारे नसते तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला असता. बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते. दरम्यान या अपघातामध्ये चालक मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता, आणि ईतर प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले होते. ते खासगी दवाखान्यात प्रथमोपचार घेऊन नियोजित ठिकाणी रवाना झाले.

* पोलिसांना माहीतच नाही*
जालना मंठा हा वळण रस्ता 24तास रहदारीचा आहे मात्र रात्री झालेला हा अपघात सकाळी अकरा वाजेपर्यंत पोलिसांना माहीतच नव्हता. याविषयी खोलात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तालुका पोलिस ठाण्याच्या दोन्ही जीप या नादुरुस्त आहेत आणि त्यामुळे पोलिसांनी रात्री गस्त घातली नाही . असा अंदाज व्यक्त केला जात आहे या अपघाताची हद्द ही तालुका पोलिसांची असल्यामुळे अपघात ठिकाणापासून इतर पोलिस ठाण्याची अनेक वाहने गेली मात्र त्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले.

* या तरुणांनी केली  मदत*
अडीच वाजता बस दुभाजकावर आदळल्यामुळे काचा फुटल्या आणि त्याचा मोठा आवाज झाला, हा आवाज ऐकून गांधीनगर परिसरात राहणाऱ्या सन्नी बुंदेले याच्यासह त्याचे मित्र विकी ससाने, संतोष सावंत, सुभाष आठवले, यांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमी प्रवाशांना मदत केली, आणि मिळेल त्या वाहनाने या प्रवाशांना बसवून दिले.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button