विहीरीत सापडले महिला आणि तिच्या 4 मुलांचे चार मृतदेह
जालना-अंबड तालुक्यातील घुन्गर्डे हदगाव येथील गंगासागर ज्ञानेश्वर आडाणी वय 32) ही महिला तिची मुले भक्ती (वय13), ईश्वरी (वय11), अक्षरा (वय 9) आणि युवराज ( वय7 ) या चार मुलांसह काल दुपारपासून गायब झाले होते.
या सर्वांचे मृतदेह आज सकाळी गावच्या शिवारात असलेल्या गट नंबर 93 मधील विहिरीत तरंगताना आढळून आले आहेत.
या दुर्घटनेची घटनेची माहिती मिळताच अंबडचे पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, गोंदीचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले.
पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सर्वांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आहेत.
घटनास्थळी तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. जागेवरच या पाचही मृतदेहाचे शवविच्छेदन इनकॅमेरा करण्याची शक्यता आहे.
दरम्यान ही दुर्घटना कशामुळे घडली आणि कारण पोलीस तपासात निष्पन्न होईल अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna