मराठवाडा
दोन लाखांचे लाचखोरी प्रकरण; तिघांना सोमवार पर्यंत न्यायालयीन कोठडी
जालना
ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान हे प्रकरण तीन लाखांवर पक्के झाले आणि त्यापैकी दोन लाखांची लाच घेताना सुधीर खिरडकर यांच्या सहकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. काल दिनांक 21 रोजी तालुका पोलीस ठाण्यात उपाधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस कर्मचारी संतोष अंभोरे ,आणि विठ्ठल खार्डे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची सुनावणी आज दिनांक 22 रोजी न्यायमूर्ती व्ही जी सूर्यवंशी यांच्यासमोर झाली आणि न्यायालयाने त्यांना सोमवार पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले .आहेत त्यामुळे त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय घेण्यात येईल.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com