1.
मराठवाडा

पाच वेळा पोलिस कोठडी मिळवत पोलिसांनी मिळवला मुद्देमाल


जालना
मोंढा रोडवर असलेल्या वसुंधरा नगरमध्ये नऊ मे रोजी भर दुपारी सागरमल जाला या व्यापाऱ्याला पिस्टलचा आणि चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये 60 हजार रुपयांचे सोने चोरट्यांनी पळविले होते या प्रकरणाचा तपास सदरबाजार पोलिसांनी पूर्ण केला आणि चोरट्यांकडून गुन्ह्यांमध्ये वापरलेले दोन पिस्टल चाकू आणि पळवलेले सोने असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या साठी आरोपींना न्यायालयाकडून 5 वेला पोलीस कोठडी मागून घ्यावी लागली.

जाला यांनी फिर्याद दिली की , ते त्यांचे श्री साई चेतना एजन्सीज या दुकानात हजर असताना काही लोक आले व त्यांना एल बी पाहीजे असे म्हणुन विनंती करु लागले फिर्यादी यांनी त्यांना सांगीतले की दुकान बंद आहे , तेव्हा काही वेळाने पुन्हा दोन व्यक्ती १२.३० वाजेच्या सुमारास परत आल्या व एल.बी. पाहीजे असे म्हणत दुकानात शिरले व त्यांनी त्यांचे हातातील चाकु व गावठी पिस्टलचा धाक दाखवुन गावठी पिस्टलचे मुठने फिर्यादीचे डोक्यात मारुन दुकानातील रोख रक्कम , गळयातील सोन्याची चैन , हातातील अंगठी असे सोन्याची दागीने असा एकुण ६०,००० / – रुपयेचा ऐवज बळजबरीने चोरुन नेल्या बाबत सविस्तर फिर्याद दिले प्रमाणे पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे गुरन ३२१/२०२१ कलम ३ ९ ४ भादवी सह ३,२५ भाहका प्रमाणे दाखल करण्यात आला होता . सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मा.श्री.विनायक देशमुख पोलीस अधिक्षक , जालना यांनी विशेष पथके तयार करुन सदर गुन्हयाची लवकरात लवकर उकल करण्या बाबत सुचना दिल्या होत्या त्या प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे सदर बाजार जालना यांचे वेगवेगळे तपासपथके तयार करण्यात आली होती .
दिनांक १२ रोजी खास दुतामार्फतीने मिळालेल्या माहीती आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथील पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हयातील पाच दरोडेखोरांना निष्पन्न करुन त्या पैकी ०३ दरोडेखोर अकालसिंग राजुसिंग जुन्नी वय २० वर्षे रा . म्हाडा कॉलनी जालना, राजु शामराव सुरासे वय ४८ वर्षे रा . साईनगर देऊळगाव राजा जि.बुलढाणा, प्रदिप केशव नरवडे वय ३० वर्षे रा . टि.व्हि.सेंटर म्हाडा कॉलनी जालना यांना ताब्यात घेऊन त्याचे कडे चौकशी केली . गुन्हयात एकुण 5 आरोपी निष्पन्न झाल्याने गुन्हयात भादवी कलम 395,397,वाढवीन्यात आले आहे .

गुन्हयाचे चौकशी दरम्यान अटकेतील तिनही आरोपीतानी उडवाउडवीची उत्तरे दिली सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने सर्वच आरोपीतांनी पोलीसांना तपासात आम्ही नशेत होतो काय घडले आम्हाला काहीच माहीती नाही असा पवीत्रा घेतला होता . पंरतु पोलीस निरीक्षक संजय देशमुख , यांचा गुन्हेगाराबाबतचा आज पावेतोचा अनुभव व तपासाचा हातखंडा याचा त्यांनी पुरेपुर उपयोग करत पोउपनि गणेश झलवार यांना तपासात सुचना केल्या. आरोपीची न्यायालयाकडुन पाच वेळा पोलीस कोठडी मंजुर करुन घेत शेवटी आरोपीताना गुन्हयातील गेला माल व गुन्हयात वापरलेले हत्यारे काढुन दिली. गुन्हा केल्याची कबुली देत गुन्हयातील व्यापारी यांना मारहाण करुन त्यांचे गळयातील एक सोन्याची चैन व हातातील एक सोन्याची अंगठी तसेच काही रोख रक्कम काढुन दिली आणि गुन्हा करतांनी वापरलेले दोन गावटी पिस्टल व एक धारधार खंजर दोन जिवंत काडतुस ( राऊंड ) असा एकुण १,५०,००० / – रुपयेचा ऐवज पोलीसानी आरोपी कडुन जप्त केलेला आहे .

गुन्हयात एकुण ०५ दरोडेखोर असुन त्या पैकी ०३ दरोडेखोराना पोलीसानी अटक केलेली असुन दोन दरोडेखोर अजुन फरार आहेत . त्यांचा लवकरच पोलीस शोध घेऊन त्यांना अटक करणार आहेत .
सुभाष भुंजग पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, संजय देशमुख पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सदर बाजार जालना. श गणेश झलवार पोलीस उप निरीक्षक व पोलीस अंमलदार, समाधान तेलंग्रे , दिपक घुगे,फुलचंद गव्हाणे ,धनाजी कावळे ,भरत आगळे ,महीला पोलीस अंमलदार ,सुमित्रा अंभोरे यांनी पार पाडली आहे.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button