म्युकर मायकोसिसवरील आजार मोफत
जालना
म्युकर मायकोसिस आजाराचा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यात आला असुन या योजनेंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतचे उपचार तसेच त्यावरील लागणारी रक्कमही शासनामार्फत भरण्यात येणार असल्यामुळे रुग्णांना म्युकर मायकोसिस आजाराचा उपचार संपुर्णत: मोफत मिळणार आहे. अशी माहिती राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मध्ये आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आरोग्य मंत्री राजेश टोपे पुढे म्हणाले की, या आजारावर उपचार करण्यासाठी जालना जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद हॉस्पीटल, जालना हॉस्पीटल, दीपक हॉस्पीटल तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असुन याबाबतचे फ्लेक्स रुग्णालयांच्या दर्शनी भागात लावण्याबरोबरच या आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजनेबाबतही जनमानसामध्ये जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
बाधित असलेल्या प्रत्येक रुग्णांशी डॉक्टरांनी फोनद्वारे संवाद साधुन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती दरदिवशी जाणुन घेऊन त्यांना उपचाराच्यासंदर्भाने आवश्यक ते मार्गदर्शन करण्याबरोबरच ज्यांना त्रास असेल अश्यांना तातडीने कोविड केअर सेन्टरमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश देत कोरोना बाधित अथवा संशयित रुणांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा प्राधान्याने मिळाव्यात. या ठिकाणची स्वच्छता दररोज होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जाही उत्तम राहील, याची दक्षता घेण्यात यावी. रुग्णांची दररोज 6 मिनिट वॉकटेस्ट घेण्यात यावी, अशा सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.