Advertisment
जालना जिल्हा

जिल्हा कचेरीतील गर्दी कमी करण्यासाठी अशी लढवली शक्कल


जालना
कोरोना असो अथवा नसो जिल्हाधिकार्‍यांच्या कचेरीत येणार्‍यांची गर्दी काही कमी होईना. निवेदन एकाचे आणि सोबत चार कार्यकर्ते त्यामुळे प्रवेशद्वारावर घडवायचे तर कोणाला? असा प्रश्न येथील सुरक्षारक्षकांना पडला होता. त्यामुळे वारंवार वादही होत होते हे टाळण्यासाठी आरोग्य प्रशासनाने नामी युक्ती शोधून काढली आणि जिल्हा कचेरीत येणाऱ्या प्रत्येकाची एंटीजन टेस्ट सुरू केली .त्यामुळे निवेदन घेऊन येणाऱ्या नागरिकांना आळा बसला .

त्यासोबत जे नागरिक निवेदन घेऊन येत होते त्यांचे सोबत विनाकारण आणखी दोन तीन लोक येत होते. यांना देखील मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. आज एकूण 90 नागरिकांची या प्रवेशद्वारात तपासणी करण्यात आली सुदैवाने यामध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही कचेरीत येणाऱ्या नागरिकाव्यतिरिक्त त्याच्यासोबत चे सर्व जण दुरूनच हा प्रकार पाहून लांब सरकत होते .जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर गावंडे हे या तपासणी वर नियंत्रण ठेवून होते.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button