Advertisment
बाल विश्व

पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी केलेल्या मारहाणीने जिल्हा निघाला ढवळून


जालना
शहरातील दीपक हॉस्पिटल मध्ये 9 एप्रिल रोजी एका तरुणाला जखमी अवस्थेत भरती करण्यात आले होते. संध्याकाळी सातच्या सुमारास भरती केल्यानंतर नऊ वाजेच्या सुमारास या तरुणाची प्राणज्योत मालवली. त्यानंतर या दुर्घटनेला डॉक्टरला जबाबदार धरत दीपक हॉस्पिटल मध्ये काही तरुणांनी तोडफोड करून अग्निशमन यंत्रणा आणि केबिनचे नुकसान केले होते. ही माहिती पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि तत्कालीन उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर यांनी घटनास्थळावर धाव घेतली तोपर्यंत तोडफोड करणाऱ्या तरुणांपैकी काही तरुण गायब झाले होते .त्यावेळी उर्वरित काही तरुण देखील तिथे उपस्थित होते मात्र ते उपस्थित का आहेत ?याची चौकशी न करता पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केल्याच्या आरोप करण्यात येत आहे. त्यातच पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर हेदेखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्यामुळे आता या प्रकरणाला वाचा फुटली आहे .आणि हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे कशी झाली मारहाण ते पाहूयात या व्हिडिओ मध्ये.


दरम्यान दीपक हॉस्पिटल मध्ये तोडफोड केल्याप्रकरणी दिनांक 10 एप्रिल रोजी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा देखील नोंदविण्यात आलेला आहे मात्र या गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपी असल्याचे स्पष्ट केले आहे.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button