Advertisment
बाल विश्व

दीड महिन्यापूर्वी झालेल्या मारहाण प्रकरणी गवळी समाज आक्रमक

शिवराज नारीयलवले
शिवराज नारीयलवले,पीडित कार्यकर्ते

जालना

गवळी समाजातील, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जालना सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना दिनांक 9 एप्रिल रोजी पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केली. दीपक हॉस्पिटल मध्ये तोडफोड झाल्या नंतर पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर यांनी गवळी समाजाला अपमानास्पद भाषा वापरली होती, आणि या संभाषणाची शूटिंग शिवराज नारियलवाले करत होते .याच दरम्यान खिरडकर यांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यानंतर सर्व पोलीस यंत्रणेने मिळून शिवराज नारियलवाले यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा निषेध म्हणून गवळी समाज आता आक्रमक झाला आहे. आणि मारहाण करणाऱ्या उपाधीक्षक सुधीर खिरडकर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करावे या मागणीचा आग्रह धरत आहे. त्या संदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनाही निवेदन दिले आहे.

माहिती देताना भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस

दरम्यान गवळी समाजाला अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल सुधीर खिरडकर यांच्यावर गुन्हा नोंदवावा या मागणीसाठी गवळी समाज बांधव कदीम जालना पोलिस ठाण्यात गेले होते. तिथे उपाधीक्षक सुनील पाटील यांची भेट घेऊन गुन्हा नोंद करण्याची मागणी केली .परंतु आधी तक्रार द्या मग चौकशी करू आणि नंतर गुन्हा नोंदवू, कारण पोलीस अधिकारी सुधीर खीरडकर हे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि चौकशी केल्याशिवाय गुन्हा नोंदवता येत नाही असा पवित्रा सुनील पाटील यांनी घेतला. मात्र गवळी समाजाला हे मान्य नसल्यामुळे त्यांनी थेट गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. यावर काही तोडगा न निघाल्याने गवळी समाज बांधव ठाण्यातून बाहेर पडले. निवेदन देताना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस पीडित सरचिटणीस शिवराज नारियलवाले, गणेश सुपारकर बाबुराव आप्पा सातकर, सुनील खरे, आदींची उपस्थिती होती.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button