पोलीस मारहाण प्रकरणी पाच पोलीस निलंबित
जालना
शहरातील कोविड हॉस्पिटल असलेल्या दीपक हॉस्पिटल येथे दिनांक 9 एप्रिल रोजी रात्री पोलिसांनी शिवराज नारियलवाले यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणाचा व्हिडिओ काल दिनांक 27 रोजी व्हायरल झाला आणि पोलिस दलासह सर्वत्र खळबळ माजली. दोनच दिवसात पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव आला आणि याचा परिणाम म्हणून आज दिनांक 28 रोजी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याचे सूत्रांनी सांगितले .
दरम्यान याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसणारे कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलीस कर्मचारी महेंद्र भारसाकळे, सुमित सोळंके, नंदकिशोर ढाकणे, या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे त्यापैकी पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम यांनी निलंबन विषयी त्यांची काय भूमिका आहे ते स्पष्ट केली.