Talukaजालना जिल्हा

उमरखेडा येथे हायमास्ट पथदिव्यांचे उद्घाटन


जालना दिनांक 19
मंठा तालुक्यातील उमरखेडा येथे हायमास्ट पथदिव्यांचे उद्घाटन माजी आमदार धोंडीराम राठोड यांच्या हस्ते काल करण्यात आले.

विधान परिषदेचे सदस्य आमदार राजेश राठोड यांच्या निधीमधून उमरखेडा येथे 30 पथदिवे मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 18 पथदिव्यांचे उद्घाटन माजी आमदार धोंडीराम राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. उर्वरित 12 पथदिवे हे दुसऱ्या टप्प्यात मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याच सोबत त्यांच्या कार्य कालामध्ये देखील उमरखेडा गावचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि आता त्यांचे चिरंजीव आमदार राजेश राठोड हे देखील उर्वरित विकास करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
यावेळी सरपंच प्रताप जाधव, उपसरपंच आनंद जाधव ,रंगनाथ कुलकर्णी, दगडू राठोड, देविदास पवार ,दीपक कुलकर्णी आदि गावकरी उपस्थिती होते.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button