बाल विश्व

उद्यापासून पुन्हा लॉककडाऊन


जालना

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन पावले उचलत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्या रविवार दिनांक 27 पासून पुन्हा काही प्रमाणात लॉक डाऊन सुरू होणार आहे. यासंदर्भातील आदेश प्रभारी जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी आजच जारी केले आहेत.

नवीन आदेशानुसार जमावबंदी आणि संचारबंदी असे दोन्ही आदेश लागू होणार आहेत. संचार बंदी मध्ये सायंकाळी पाच ते सकाळी पाच वाजेपर्यंत मुक्त संचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर जमावबंदी मध्ये पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. परंतु पूर्वपरवानगीने पूर्वनियोजित कार्यक्रम घेता येऊ शकतात .त्यामध्ये लग्न समारंभ आणि अंत्यविधी याचा समावेश नाही. अत्यावश्यक सेवा औषधी वगळून रोज सायंकाळी चार वाजेपर्यंत चालू राहतील, आणि या सेवादेखील शनिवार आणि रविवारी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत .सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे ही नागरिकांसाठी बंद राहणार असून पारंपारिक पद्धतीने सेवेकरी ही सेवा चालू ठेवू शकतील .लग्नसमारंभाला 50 तर अंत्यविधीला 20 लोकांचे बंधन घालण्यात आले आहे. सध्या शेती मशागतीचे दिवस आहेत असे असले तरीही कृषी व कृषिपूरक सेवा देणारे व्यवसाय देखील सायंकाळी चार वाजेपर्यंत चालू राहतील असे आदेशही प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. कृषी व कृषी सेवा पूरक व्यवसाय देखील सायंकाळी चार वाजेपर्यंत चालू राहतील असेही या आदेशात म्हटले आहे.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button