भाजपचे चक्काजाम आंदोलन; 3 तास वाहतूक विस्कळीत
जालना
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण काढून घेतल्या प्रकरणी आज या समाजाच्या वतीने अंबड चौफुली येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
सकाळी 11 वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होते. औरंगाबाद कडून बीडकडे आणि परभणीकडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे तिन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तीन तास वाहतूकही विस्कळीत झाली होती. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संतोष दानवे यांनी चक्काजाम आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी बोलताना आमदार दानवे म्हणाले की, या आघाडीच्या सरकारमुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे, आणि राज्य सरकार याचे खापर केंद्र सरकारच्या माथी फोडीत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही यांनी रद्द केलेले आरक्षण पुन्हा सुरू करावे अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी ओबीसी समाजाचे प्रदेशाध्यक्ष अशोक पांगारकर, नारायण चाळगे, भास्करराव दानवे, रोहित नलावडे, सुनील खरे, सिद्धिविनायक मुळे, भास्करराव दानवे, आदींची उपस्थिती होती.