Advertisment
बाल विश्व

सोन्याच्या व्यवहारात हॉलमार्किंग ला विरोध का?

जालना.

सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग हा विषय गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. तूर्तास तरी जालना जिल्ह्याला हॉलमार्किंग च्या बंधनात शासनाने समाविष्ट केले नाही, मात्र भविष्यकाळात जालना जिल्हा या हॉलमार्किंग च्या कक्षेत घेण्यासाठी शासनाच्या वतीने पूर्वतयारी सुरू आहे. या हॉलमार्किंग संदर्भात व्यापारी आणि ग्राहक यांच्यामध्ये प्रचंड गैरसमज आहेत. शासनाच्या या निर्णयाचा दोघांनाही फायदा होणार आहे ,मात्र या फायद्याच्या चर्चेपेक्षा तोटा कसा होईल यावरच जास्त चर्चा सुरू आहे आणि शासनाच्या हा निर्णय उधळून लावण्यासाठी सर्वत्र प्रयत्न चालू आहेत. परंतु खर्‍या अर्थाने विचार केला तर हॉलमार्किंग ही प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काळा पैसा पांढरा करणाऱ्या अनेक व्यपाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळणार आहेत. ग्राहकांना थोडासा कर भरून शुद्ध आणि खात्रीचे सोने मिळणार आहे जे कधीही विकले तरी त्याची योग्य किंमत मिळेल.त्यामुळे सरळ मार्गाने व्यवसाय करणाऱ्या सराफांनी या निर्णयाचे स्वागतच केलं आहे.धाबे दणाणले आहे ते चुकीच्या मार्गाने सोने घेणाऱ्या आणि अन्य धातूची मिसळ करून सोने म्हणून विकणाऱ्या सराफांचे. त्यामुळेच या निर्णयाला विरोध होत आहे. या निर्णयाचे फायदे आणि तोटे दोन्ही बाजू जाणून घेण्यासाठी सराफा बाजारातील प्रतिष्ठित व्यापारी भरत ज्वेलर्स चे संचालक भरत जैन यांच्याशी केलेली ही चर्चा.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button