नाविन्यपूर्ण योजनेसाठी जालन्याला 30 कोटींचे आश्वासन तर कोरोना चे नियम पाळत कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू करणार- मंत्री उदय सामंत
जालना
युती सरकारच्या काळात जालन्यात रसायन तंत्रज्ञान ही संस्था सुरू झाली. संस्थेमुळे निश्चितच मराठवाड्याला फायदा होणार आहे मात्र संस्था मान्यता देऊन पुढील काम केले नाही, आघाडी सरकारच्या काळात आत्तापर्यंत या संस्थेला 20 कोटी रुपये देण्यात आले आहेत आणि हा सर्व निधी प्राध्यापकांच्या पगारावर आणि इमारत भाड्यावर खर्च झाला आहे. तीन वर्षांमध्ये इमारतीच्या भाड्यावर पाच कोटी रुपयांचा खर्च कसा? याची चौकशी केली जाईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
जालना जिल्ह्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाची माहिती घेण्यासाठी ते आज जालन्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, शिवसेनेचे पदाधिकारी शिवाजी चौथे, बाबासाहेब इंगळे, आदींची उपस्थिती होती.
दरम्यान प्रस्तावना करताना माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी या रसायन तंत्रज्ञान संस्था विषयी विस्तृत माहिती दिली. त्या अनुषंगाने या संस्थेचे कामकाज सुरू झाल्यानंतर दोनशे तीन एकर जमीन फक्त मोजली आहे मात्र अद्याप पर्यंत तिच्यावर काहीच काम झाले नाही. ी जमीन मोजून संस्थेच्या ताब्यात देण्यासाठी जिल्हाधिकार्यांना सूचना दिल्या आहेत आणि संरक्षण भिंतीसाठी सात कोटी रुपये देणार आहोत. त्यासोबत पॉलिटेक्निक कॉलेज च्या अर्धवट असलेली इमारती पूर्ण करण्यासाठी दीड कोटी रुपये देणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली .
प्रस्तावना मध्ये माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जालन्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्याला अनुसरून प्रस्ताव आल्यानंतर इमारत असेल तर 25 कोटी आणि नसेल तर तीस कोटी रुपये जमिनीसह देण्याचे आश्वासन ही मंत्रिमहोदयांनी दिले.
दरम्यान अंबड येथे सुरू असलेल्या मॉडेल कॉलेजच्या प्राध्यापकांच्या पगाराविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले. हे कॉलेज सुरू झाले त्यावेळी वर्षाला एक कोटी 39 लाख दिल्या जातील असे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना वरचे 39 लाख रुपये दिल्याच गेले नाहीत. यासंदर्भात विद्यापीठाशी चर्चा करून लवकरच तो निधी दिला जाईल आणि प्राध्यापकांचे पूर्ण पगार निघतील असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.