जालन्यातील पहिलं हृदय विकार रुग्णालय “डॉक्टर्स डे” निमित्त सुरू
जालना .
आज “डॉक्टर्स डे” अर्थात डॉक्टरांसाठी विशेष दिवस याच विशेष दिवसाच औचित्य साधलं. जालन्यामध्ये हृदयाशी संबंधित अद्यावत उपकरणांनी सुसज्ज असलेलं हृदय विकारांचा हॉस्पिटल सुरू झाला आहे. डॉ. रामेश्वर सानप आणि डॉ. विष्णू भुते या डॉक्टरांच्या जोडगोळीने जिल्हयातील पहिलं आर. व्ही. मेडिकेअर डेडिकेटेड कार्डिओलॉजी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सुरू केलं आहे .
या हॉस्पिटलच वैशिष्ट्य असे आहे की, जालना जिल्ह्यात पहिले हॉस्पिटल आणि दोन्ही डॉक्टर सात दिवस चोवीस तास ते रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांना 24 तास ही सेवा मिळेल . गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी अन्य ठिकाणी जाण्याची आता गरज पडणार नाही. जालना जिल्ह्यातील नागरिकांना ही एक मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे हा आजार असा आहे की एकदा झटका आल्यानंतर तो व्यक्ती परत दिसेलच याचा नेम नाही .त्यामुळे त्याला वेळीच उपचार मिळणे गरजेचे असते.हे उपचार आता जालन्यातच मिळू शकतील.
(जालन्यात असे कांही नवीन उपक्रम असतील तर नक्की कळवा.आणि अपडेट बातम्या पहाण्यासाठी प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा EDTV jalna हे एप
8275950190)