बाल विश्व
आ.धस यांच्यावर कारवाई करा-ओबीसी ची मागणी
जालना
ओबीसी समाजाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविषयी अवमान करणारी भाषा वापरल्याबद्दल विधान परिषद सदस्य सुरेश धस यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे.
ओबीसी समाजाचे प्रतिनिधी राजेंद्र राख, बाबुरावमामा सतकर, प्राध्यापक सत्संग मुंडे, ओमप्रकाश चितळकर,
आदींची यावेळी उपस्थिती होती.
अधिक माहिती देताना राजेंद्र राख यांनी सांगितले की, दिनांक सहा आणि सात जून रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ येथे ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाच्या न्यायहक्कासाठी परिषद घेण्यात आली.
या परिषदेमध्ये सर्वपक्षीय ओबीसी नेते सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी बीड येथील एका कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भात अपशब्द वापरले आहेत. या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
( ताज्या घडामोडी पाहण्यासाठी डाऊनलोड करा edtv jalna app)