मद्यधुंद स्कार्पिओ चालकाचा थरार ; सुज्ञ नागरिकांनी दगड मारून थांबविली गाडी
जालना
सुज्ञ नागरिकांमुळे चार जणांना जखमी करणाऱ्या स्कार्पियो चा थरार थांबविण्यात पोलिसांना यश आले आहे. या नागरिकांनी मद्यधुंद अवस्थेत चालवत असलेल्या या स्कार्पिओ वर दगड मारून तिच्या काचा फोडल्या. त्याच वेळी पोलीस देखील तिथे हजर झाले त्यामुळे पुढे होणारे अपघात थांबविण्यात यश आले आहे. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास स्कार्पिओ क्रमांक एम. एच. 46 एसी 5501 नाव्हा रोड कडून मंठा चौफुली मार्गे औरंगाबाद चौफुली कडे जात होती. याच वेळी मंठा चौफुली येथे रामनगर भागात राहणाऱ्या आनंद संजय शिंदे याच्या दुचाकीला ठोस दिली यावेळी. त्याच्यासोबत असलेला कपिल मस्के हा मित्र देखील जखमी झाला. या दोघांच्या मदतीसाठी रितिक कोरेलु हा त्यांचा मित्र धावत येत असताना त्याला देखील या स्कार्पिओ ने ठोस देऊन जखमी केले. तिथून पुढे ही स्कार्पिओ रेवगाव टी पॉईंट जवळ असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली उतरल्यानंतर आणखी एका मालवाहू गाडीला ठोस दिली एम.एच.21बीएच 3439 असा त्या गाडीचा क्रमांक आहे. हा सर्व थरार या स्कार्पिओ च्या मागे दुचाकीवर येत असलेल्या एका इंग्रजी शाळेतील कर्मचाऱ्यांनी पहिला त्यावेळी हा चालक मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर गाडी चालवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे या गाडीच्या पुढे जाऊन थांबवणे आवश्यक होते. त्यामुळे स्वतःची दुचाकी वेगात घेऊन कदीम जालना पोलिस ठाण्यासमोर या स्कार्पिओ ला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती थांबली नाही त्यामुळे दगड मारून या गाडीला थांबवणे भाग पडले. विशेष म्हणजे या स्कार्पिओ च्या मागे घनसांवगी रोडच्या फुलापासून पोलिसांची गाडी देखील होती मात्र पोलिसांनी या गाडीला न थांबविता कदीम जालना पोलीसांची आणि चंदंनजिरा पोलिसांशी संपर्क साधून या गाडीला थांबविण्याचे सुचित केले. तोपर्यंत या स्कार्पिओ ने चार जणांना ठोस देऊन जखमी केले होते.
शेवटी कदीम जालना पोलिस ठाण्यासमोर सुज्ञ नागरिकांच्या दक्षतेमुळे ही गाडी थांबली. याच वेळी पोहोचलेल्या पोलिसांनी गाडीचा चालक राहुल सुभाष घुमारे राहणार निगडी तालुका पाटोदा जिल्हा बीड, याला ताब्यात घेतले.
https://youtu.be/TfurKXE22gA
पोलीस ठाण्याच्या हद्दीवरून गोंधळ
ही स्कार्पिओ सिंदखेड राजा कडून येत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आणि नाव्हा गावाजवळ देखील एका वाहनाला या गाडीने उडविले असल्याचे सांगितले. हे गाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते .त्यानंतर मंठा चौफुली च्या पुढे सदर बाजार पोलिस ठाण्याची हद्द आणि उड्डाण पुलाच्या पुढे कदीम जालना पोलिस ठाण्याची हद्द. या तिन्ही ठिकाणी अपघात झाल्यामुळे नेमका गुन्हा दाखल करायचा कुठे? आणि कोणी असा प्रश्न निर्माण झाला होता. पहिला गुन्हा हा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्यामुळेच कदीम जालना आणि सदर बाजार वाल्यांनी सांगितले की तालुका पोलीस ठाण्यात करावे. परंतु तेथून कोणी तक्रार दिली नाही. दुसरा गुन्हा सदर बाजार ठाण्याच्या हद्दीत मात्र तिथेही कोणी तक्रार द्यायला आले नाही. आणि तिसरा गुन्हा कदीम जालना च्या हद्दीत इथेही कोणी तक्रार दिली नाही त्यामुळे गुन्हा दाखल करायचा तर कुठे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता शेवटी ज्या तरुणाला या स्कार्पिओ ने जखमी केले आहे तो आनंद संजय शिंदे हा जालना क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्याने दिलेल्या जबाबावरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.