कोरोनामुळे मागे पडलेल्या शिक्षण क्षेत्राला पुढे आणण्यासाठी प्राधान्य; अनुज जिंदाल
जालना
सध्य परिस्थितीत सर्वांच्याच काळजीचा विषय असलेल्या कोविड आजाराच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन त्यानंतर शिक्षण विभागाला सक्षम करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची माहिती जालना जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज जिंदाल यांनी दिली.
जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांची बदली झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांच्याकडे दिला होता. एक जुलै रोजी ऑनलाईन पदभार घेतल्यानंतर शनिवार दिनांक 3 रोजी प्रत्यक्ष हजर राहून त्यांनी जालना जिल्हा परिषदेचे 23 वे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. यासंदर्भात प्रतिनिधीशी बोलतांना श्री जिंदाल म्हणाले की सध्या परिस्थिती मध्ये कोरोना आजार हा सर्वांच्या काळजीचा विषय ठरलेला आहे आणि याला आणि याला हद्दपार करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे त्यावर आपण भर देणार आहोत. त्यापाठोपाठ गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे त्यामुळे या शिक्षण क्षेत्राला सक्षम करण्यासाठी भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.