Advertisment
बाल विश्व

राजकीय पुढाऱ्याच्या हस्तक्षेपामुळे बारगळले कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन

जालना
कोरोनाच्या काळात जीवाची बाजी लावून आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम केले, आणि आता आता हा संसर्ग हम हळूहळू कमी होत असताना या कर्मचाऱ्यांना एक जुलैपासून कार्यमुक्त करण्यात आले आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या घरासमोर आज या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मात्र मध्येच एका राजकीय पुढार्‍याने या आंदोलनाचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे आंदोलन बारगळले, आणि कार्यकर्त्यांना विनाकारण पोलिसांच्या रोषाला बळी पडावे लागले. हा प्रकार अंगलट येत असल्याचे पाहून आंदोलकांनी या कार्यकर्त्याला बाजूला सरकवले.

जालना जिल्ह्यासह परिसरातील काही जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज सोमवारी सकाळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या ऋषी पार्क येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेशी आंदोलक सहमती होते आणि निवेदन देऊन या आंदोलनाचा समारोप काही केला जाणार होता. मात्र मध्येच का राजकीय पुढार्‍याने या आंदोलनाशी संबंध नसतानाही नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिस प्रशासन चिडले त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना धारेवर धरत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करायला सुरुवात केली. त्यामुळे घाबरून गेलेल्या या आंदोलकांनी केवळ निवेदन देऊन बचाव करून घेतला. दरम्यान या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी आलेला राजकीय पुढारी कोण? हेच आंदोलकांना माहीत नव्हते. त्यांनी अधिक माहिती घेतल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीच्या एका विभागाशी निगडित असल्याचे कळाले आणि त्यामुळेच की काय राष्ट्रवादी काँग्रेसचे आरोग्यमंत्री असलेल्या राजेश टोपे यांचे विरोधातील या आंदोलनाचे नेतृत्व करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. असा सूरही या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाला.
दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने कदीम जालना पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक टाक यांनी निवेदन स्वीकारले आणि आंदोलनाचा समारोप झाला.

*मंत्राच्या घरात घुसण्याचा परिचारिकेचा प्रयत्न*

सर्व आंदोलन संपल्यानंतर कर्मचारी परतत असताना चार-पाच परिचारिकांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी प्रवेशद्वारातच त्यांना अडविले. विविध बहाने सांगूनही परिचारिका आत मध्ये जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी तिला घेरले आणि बाहेर आणले.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button