जालना जिल्हा

फुस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा 24 तासात तपास


जालना
जालना तालुक्यातील वाघरुळ येथे राहत असलेल्या तेरा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी तालुका पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात तपास करून आरोपीला पुणे जिल्ह्यातील यावत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले आहे. अवघ्या चोवीस तासात केलेल्या या तपासाबद्दल वाघरुळ येथील ग्रामस्थांनी तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी वडते यांची भेट घेऊन अभिनंदन केले आहे.

वाघरुळ येथील एक 13 वर्ष 2 महिने वयाची मुलगी याच गावात एका महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या तरुणाने फूस लावून पळवून नेले होती. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती. त्या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान या जोडी जवळ असलेला मोबाईल ही त्यांनी बंद केला होता .त्यामुळे त्यांचा संपर्क तुटला होता. पोलिसांनी तपास यंत्रणा कामाला लावली आणि पीडित मुलीचे फोटो विविध पोलिस ठाण्यांमध्ये पाठविले.त्याच दरम्यान आरोपीचा चुलत भाऊ यावत जिल्हा पुणे येथे राहत असल्याचे पोलिसांना कळाले. त्या दिशेने तपास यंत्रणा सुरू झाला. काल दिनांक चार रोजी तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते हे पोलीस कॉन्स्टेबल पी. सी. जारवाल, महिला पोलीस कर्मचारी एम. एस. पाथरे यांना घेऊन खाजगी वाहनाने यावत जिल्हा पुणे तेथे रवाना झाले. तिथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी दोघांनाही ताब्यात घेऊन आज सकाळी जालना येथे घेऊन आले.
दरम्यान या प्रकरणातील आरोपी हर्ष आनंद पंडित शेजुळवय 21 हा सिंदखेड राजा तालुक्यातील चांगेफळ येथील रहिवासी आहे. त्याने वाघरुळ येथील एका महाविद्यालयात तृतीय वर्षासाठी प्रवेश घेतला होता त्या निमित्ताने त्याचे वाघुळ येथे येणे-जाणे होते. आणि त्याची मावशी देखील वाघरूळ येथे राहत होती. या मावशीच्या घराशेजारीच पीडित मुलीचे घर होते त्यामुळे त्याने या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अधिक माहिती विचारली असता वाघुळ येथून हे दोघे बस ने औरंगाबाद शिरूर मार्गे पारगाव तालुका दौंड ,जिल्हा पुणे येथे गेल्याचे सांगितले. दरम्यानच्या काळात आरोपी हर्षनंद पंडित शेजुळ याने या मुलीचा विनयभंग केला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केले आहे. त्यानुसार मुलीची वैद्यकीय तपासणी केली आहे. बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये या तरुणावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button