मराठवाडा
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणून घेतले बांबू लागवडीचे महत्त्व: माजी आमदार पाशा पटेल यांनी केले मार्गदर्शन
जालना -भविष्यामध्ये पुढच्या पिढीला तंदुरुस्त पहायचे असेल तर बांबूची लागवड करा.असे आवाहन माजी आमदार तथा राष्ट्रीय ग्रामीण विकास पंचायत राज संस्थांनचे सदस्य पाशा पटेल यांनी केले.जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिनांक 6 रोजी महसूल, वन विभाग, कृषी विभाग व ग्राम विकास विभागाच्यावतीने बांबू लागवड मार्गदर्शन व परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
- https://youtu.be/Ig0cWfBJlxE
पुढे मार्गदर्शन करताना पाशा पटेल म्हणाले की, दिवसेंदिवस जमिनीचे तापमान वाढत आहे आणि कार्बन ही वाढत आहे. या सर्वाला एकमेव पर्याय म्हणजे वृक्षांची लागवड करणे आहे, मात्र शेतकऱ्यांच्या अन्य पिकाचे नुकसान होत असल्यामुळे ते शेतामध्ये मोठमोठ्या वृक्षांची लागवड करीत नाहीत. त्याला पर्याय म्हणून आता बांबूची लागवड करावी जेणेकरून पारंपारिक उत्पन्नापेक्षा भरघोस उत्पन्न मिळेल आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल. बांबू ही झपाट्याने वाढणारी आणि मुबलक प्रमाणात ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे. येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल वरील वाहने बंद होतील याचे कारण म्हणजे त्यामधून येणारा धूर हा घातक आहे ,आणि पेट्रोलला पर्याय म्हणून देखील बांबू पासून इथेनॉल ,फर्निचर, कागद अशा अनेक वस्तू तयार होतात त्यामुळे इथून पुढे बांबूची लागवड करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या परिषदेला तहसीलदार श्रीकांत भुजबळ जिल्हा परिषद कृषी विभागाचे अधिकारी विजय माईनकर, आणि अन्य विभागांचे अधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com