पोलिसांनी पकडला 20 लाखांचा गुटखा
जालना- महाराष्ट्रात विक्रीसाठी बंद असलेला सुमारे वीस लाखांचा गुटखा पकडलाा आहे आणि एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथून यवतमाळ कडे एक आयशर ट्रक हा गुटखा घेऊन जात असल्याची माहिती होती. त्यानुसार आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास देऊळगाव राजा रोडवर गोंदेगाव शिवारात पोलिसांनी सापळा रचला आणि यावेळी ट्रक क्रमांक एम एच 12 ई क्यू 1936 हा येत असल्याचे दिसले. या ट्रकला थांबून झडती घेतली असता त्यामध्ये प्रीमियम राज निवास गुटखा 12720 पाकीट आणि प्रीमियम एक्स एल जाफरानी जर्दा 12720 पाकिटे. असा एकूण वीस लाख 60 हजार 640 रुपयांचा गुटका आणि दहा लाख रुपयांचे आयशर कंपनी चे ट्रक असा एकूण 30 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे
यााप्रकरणी संजय देवराव मडावी, राहणार कादनाळे मळा, तालुका पुरंदर ,जिल्हा पुणे येथील मनप्रीत सरदार याला ताब्यात घेतले असू तालुका पोलीस ठाण्यामध्ये अन्न निरीक्षक श्री कुलकर्णी यांनी दिलेल्याा तक्रारीवरू गुन्हा नोंंंद करण्यात आला आहे .