मराठवाडा

किनार आणि स्वप्नांच्या अलीकडले या कथांमधून सशक्त लेखन-डॉ. संजीवनी तडेगावकर



जालना-

फक्त स्वप्नांवर आधारित नव्हे तर वास्तववादी आणि अनुभवलेलं साहित्य प्रा. सुरेखा मत्सावार यांनी लिहिलं आहे, या साहित्यामधून महिलांचे प्रतिनिधित्व करणारे सशक्त कथानक समोर उभे राहते, असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्य डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी केले.प्रा.सुरेखा मत्सावार यांनी लिहिलेल्या “स्वप्नांच्या अलीकडले” “किनार” आणि “महात्मा गांधी प्रणित शिक्षण संकल्पना” या तीन पुस्तकांचे प्रकाशन तडेगावकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी व्यासपीठावर डॉ.प्रतिभा श्रीपत, इंजिनीयर एस.एन. कुलकर्णी यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषदेचे सचिव पंडित तडेगावकर, शिवाजी कायंदे, शुभांगी नेवासेकर, वैशाली मत्सावार, आणि निमंत्रक डॉ. जितेंद्र मत्सावार यांची उपस्थिती होती.
प्रकाशन कार्यक्रमानंतर इंजिनीयर कुलकर्णी आणि डॉ. प्रतिभा श्रीपत यांनी मत्सावार यांनी लिहिलेल्या स्वप्नांच्या अलिकडले आणि किनार या दोन्ही कथा संग्रह मधून लेखिकेने मांडलेल्या विचारांवर भाष्य व्यक्त केले.

Related Articles