Advertisment
बाल विश्व

निमोनिया वरील लसीचे उद्घाटन मात्र गोवरची लस गायब

जालना-निमोनिया आजारावर उपाय करणारी पीसीव्ही ही नवीन लस उपलब्ध झाली असून या लसीचे महाराष्ट्रात पहिल्यांदा उद्घाटन जालना येथील स्त्री रुग्णालयात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज झाले. न्यूमोनिया पासून बचाव करणारी ही लस जरी बाजारात आली असली तरी, गेल्या अनेक महिन्यांपासून गोवर आणि रूबेला सारख्या आजारावर उपचार करणारी लस मात्र जिल्ह्यामध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे महिलावर्ग संबंधित दवाखान्यांमध्ये जाऊन चपला झिजवत आहे.

स्त्री रुग्णालयात आज उद्घाटन झालेल्या या लसीकरणाच्या वेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर, डॉक्टर जयश्री भुसारे, डॉक्टर शितल सोनी, डॉक्टर आर. एस. पाटील, कल्याणराव सपाटे यांच्यासह आरोग्य विभागातील अन्य सहकाऱ्यांची उपस्थिती होती .

दरम्यान pcv या नावाने एक वर्षाच्या आतील बालकांना ही लस दिली जाणार आहे. पहिल्या दीड महिन्यात आणि दुसरी लस साडेतीन महिन्यानंतर दिली जाणार आहे तर तिसरी लस बूस्टर डोस म्हणून नऊ महिने पूर्ण झाल्यावर दिली जाणार आहे .ही लस पूर्णपणे मोफत असणार आहे.

*एम आर वॅक्सिंन गायब*

गोवर आणि रूबेला पासून बचाव करणारे एमआर वॅक्सिंन हे गेल्या दोन महिन्यांपासून उपलब्ध नाही. नवजात बालकांना वयाच्या नवव्या  आणि 16 ते 24 महिन्यादरम्यान दुसरा डोस दिला जातो. लस उपलब्ध नसल्यामुळे महिला वर्गाची गैरसोय होत आहे.

*आरोग्य रत्न पुरस्कार लवकरच*

ठाकरे सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने “वंदनिय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार” हा पुरस्कार जाहीर केला मात्र गेल्या दोन वर्षांपासून या पुरस्काराचे वितरण झाले नाही. त्यामुळे जालना जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आणि या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आह आहे. पुरस्कार मिळो  अथवा  न  मिळो मात्र निकाल जाहीर करावाअशी त्यांची मागणी आहे मात्र ती देखील पूर्ण होत नाही. यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोविड आजारामुळे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे हे पुरस्कार राहिले आहे आता लवकरच या पुरस्कारांचा निकाल लावू. आणि वितरित करू.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Check Also
Close
Back to top button