आनंदी स्वामी महाराजांच्या उत्सवाला प्रारंभ
जालना- प्रतिपंढरपूर म्हणून जालना शहरातील आनंदी स्वामी महाराजांची ख्याती आहे. आषाढी एकादशीनिमित्त इथे मोठी यात्रा भरते. या आनंदी स्वामी महाराजांच्या नावाने जुन्या चालण्यात एक पूर्ण गल्लीच आहे. या यात्रेचे महत्त्व म्हणजे बर वार समाजासाठी ही दिवाळी असते .कारण लाकडी साहित्य विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.
कोरोना ची परिस्थिती लक्षात घेता दुसऱ्या वर्षी देखील या यात्रेवर बंदी आहे. असे असले तरी भाविकांचा उत्साह कमी झालेला नाही. खरेदीसाठी नाहीतरी देव दर्शनासाठी म्हणून मंदिरामध्ये वेळेनुसार भाविक दर्शन घेऊन जातआहेत. मंगळवारी आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्त श्री आनंदी स्वामी महाराज यांच्या विविध वेशभूषा यांना उद्या बुधवारपासून सुरुवात होणार आहे .सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी आषाढी एकादशीच्या उत्सवाला सुरुवात झाली. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कोरोना काळ वगळत या यात्रेत कधीही खंड पडलेला नाही .जालना शहरच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक भागांमधून भाविक दर्शनासाठी येतात. उद्यापासून श्री आनंदी स्वामी महाराजांची विविध रूपे सुरू होणार आहेत आणि त्यामध्ये दत्तात्रय, बालाजी, खंडेराय, आदी रूपांचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंदिरामध्ये आकर्षक सजावट केली आहे. त्यामध्ये झुंबर, विविध रंगीबेरंगी फुले, विद्युत रोषणाई, याचा समावेश आहे .
यावर्षीच्या यात्रेबद्दल बोलताना मंदिराचे व्यवस्थापक बाळू महाराज ढोले म्हणाले की, यात्रा नसल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी ती नाराजी दूर करण्यासाठी भाविकांना दर्शनासाठी गर्दी न करता मंदिरात सोडले जात आहे. आणि एकादशीच्या दिवशी पालखी मिरवणुकीसाठी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना परवानगी देण्यासाठी साकडे घातले आहे .त्यामुळे ठराविक वेळेसाठी परवानगी मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केले आहे.