घराची भिंत कोसळून नात ठार :आजी-आजोबा जखमी
जालना -बदनापूर तालुक्यातील ढासला येथे भिंत पडून 8 वर्षाची नात दगावली तर व आजोबा गंभीर जखमी झाले आहेत.
बदनापूर तालुक्यातील ढासला येथे मध्यरात्री रात्री 12 वाजेच्या सुमारास पाऊस चालू असताना घराची भिंत अंगावर पडून श्रवणी मदन संगोळे वय 8 वर्ष,जागीच ठार झाली तर शांताबाई सारंगधर सोनवणे वय 60 व सारंगधर विश्वनाथ सोनवणे वय 65 दोघे जखमी झाले आहेत. जखमींना गावातील
अशोक नाईक, राजू सोनवणे, शिवाजी सोनवणे यांनी खाजगी वाहनात बदनापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले व आजी शांताबाई या गंभीर असल्याने त्यांना औरंगाबादला शासकीय रुग्णालयात हलविले आहे.
सण 2015मध्ये दुधना नदीला आलेल्या पुरामुळे सुमारे दोनशे ते अडीचशे घरांना बाधा पोहोचली होती. आणि प्रशासनाने या घरांचे पंचनामेेेे करून नुकसान भरपाई देखील दिली होती. या नुकसान भरपाई सोबतच पक्के घरे बांधून देण्याचे आश्वासन देखील जिल्हा प्रशासनाने दिले हो .मात्र ते अद्याप पर्यंत पूर्ण झालेच नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे असा आरोप गावकऱ्यांनीकेला यााआहे. तसेच आता तरी शासनाने जागे व्हावे आणि या नुकसानीची भरपाई करून देऊन पक्के घरे बांधून द्यावीत अशी माग सरपंच राम पाटील यांनी केली आहे.
प्रधान आवास योजने अंतर्गत ड योजनेमध्ये जवळपास 300 घरकुलांचे शासना मार्फत विविध प्रकारचे सर्वे करण्यात आले.सदरील प्रक्रिया
ही सन 2016 पासून सुरू आहे. परंतु अद्याप पर्यंत शासनाकडून मजुरी देण्यात आली नाही .