बाल विश्व

आता गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरेल डायल112

जालना -वाढती गुन्हेगारी आणि संकटात सापडलेल्या नागरिकांना मिळणारी मदत या दोन्ही मधील तफावत कमी करण्यासाठी आता महाराष्ट्र इमर्जन्सी प्रोजेक्ट ही नवीन प्रणाली सुरू होत आहे .डायल  112 असे या प्रणालीचे नाव आहे.जीपीएस प्रणालीद्वारे संकटात सापडलेल्या नागरिकाला त्वरित मदत मिळण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत ही प्रणाली राबविली जात आहे. त्यामुळे आता गुन्हेगारांसाठी 112 हा नंबर कर्दनकाळ ठरणार आहे

*जिल्हा नियोजन समितीकडून 1 कोटी 43 लाख* 

जालना जिल्हा नियोजन समिती च्या वतीने पोलिस प्रशासनाला वाहने खरेदी करण्यासाठी एक कोटी 43 लाख रुपये देण्यात आले होते .यामधून पोलिसांनी 13 चार चाकी वाहने , 92 दुचाकी वाहने खरेदी केली आहेत. 13 चार चाकी  पैकी 4 वाहने हि पिंक असणार आहेत (महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव) तर उर्वरित नऊ वाहने गरजेनुसार संबंधित पोलिस ठाण्याला देण्यात येणार आहेत. त्याच सोबत पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून देखील 7 नवीन चार चाकी वाहने आली आहेत .अशी एकूण वीस नवीन चार चाकी  आणि 92 दुचाकी वाहनांचा ताफा जिल्हा पोलिस यंत्रणेत दाखल झाला आहे.

*जीपीएस प्रणाली*

या सर्व वाहनांना जीपीएस प्रणालीद्वारे जोडले गेलेले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या एखाद्या व्यक्तीने 112  डायल केले तर मुंबई येथील नियंत्रण कक्षाला ही माहिती जाईल आणि तेथून संबंधित पोलिस यंत्रणेला ही माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस यंत्रणा या घटना स्थळाच्या जवळ कोणते वाहन आहे याचा अंदाज जीपीएस प्रणाली द्वारे घेऊन त्या ठिकाणावर पोलिसांना पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे काही वेळातच गरजूंना मदत मिळणार आहे .अपघात झाल्यानंतर वेळेत उपचार मिळतील तर वाटमारी करणाऱ्यांना पकडण्यासाठी देखील याचा चांगला उपयोग होणार आहे.

*दीडशे पोलिसांना प्रशिक्षण*

ही यंत्रणा राबवायची कशी याविषयी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील दीडशे पोलिसांना  प्रशिक्षण दिले जात आहे .मुंबई येथून आलेले प्रशिक्षक 50 -50 च्या तीन टीमला हे प्रशिक्षण देत आहेत.

रंगीत तालीम

* कामचुकारपणा ला बसेल आळा*

ग्रामीण भागामध्ये बीट जमादार आला खेड्यात जाऊन  तपास करावा लागतो. मात्र स्वतःचे वाहन किंवा इंधनाचा खर्च करण्यासाठी टाळाटाळ केली जाते. त्यामुळे तपासही अडकून पडतो मात्र आता हे सरकारी वाहन मिळाल्यामुळे इंधनही सरकारीच असणार आहे .त्यामुळे कामचुकार पणा करणाऱ्या जमादार आता वरिष्ठ अधिकारी तपासाविषयी जाब विचारू शकणार आहेत.

रंगीत तालीम येत्या दोन दिवसांमध्ये ही सर्व वाहने संबंधित पोलीस ठाण्याला वितरित केल्या जाणार आहेत त्या अनुषंगाने पोलीस कवायत मैदानावर याची रंगीत तालीम सुरू आहे. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गृह विभागाचे पोलीस उपाधीक्षक संजय व्यास यांच्या नियंत्रणाखाली ही तालीम सुरू आहे. त्यासाठी राखीव पोलीस निरीक्षक टीबी आगरकर मोटर परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक एसएस डोईफोडे राखीव पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक एस के चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती रंगीत तालीम चे सूत्रसंचालन श्रीमती शमशाद पठाण आणि संजय सोनवणे यांनी केले प्लाटून कमांडर म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास चित्राल रामभाऊ चव्हाण यांनी जबाबदारी पार पाडली आणि या सर्व रंगीत तालीम चे चित्रीकरण ड्रोन ऑपरेटर गणेश वाघ आणि रवी खलसे यांनी केले आहे

(ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी डाऊनलोड करा edtv jalna app)

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button