1.
बाल विश्व

आरोग्य विभागाच्या विरोधात आमदार बबनराव लोणीकर यांची न्यायालयात याचिका

कोविड च्या काळात जालना जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेत झालेल्या मनमानी च्या विरोधात माजी मंत्री तथा परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  जिल्हाधिकारी ,जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागाच्या सचिवांना प्रतिवादी केले आहे.

कोविडच्या काळात जालना जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेनेमध्ये अनेक त्रुटी  राहिल्या होत्या आणि मृत्यू दर ही मोठ्या प्रमाणात होता .या सर्व बाबींना आरोग्य विभागच जबाबदार आहे. विविध कंपन्यांनी या काळामध्ये आरोग्य विभागाला मदत केली आहे, आणि त्यांनी साहित्यही दिले आहे .कोट्यावधी रुपयांचे या साहित्याची कुठेही नोंद नाही, खरेतर कंपन्यांनी हा निधी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने धनादेशाद्वारे देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी याची रीतसर निविदा काढून ते खरेदी करायला हवे होते  मात्र तसे कुठेही झाले नाही. जिल्हाधिकार्‍यांकडे कोणी किती निधी दिला ?याचीही नोंद नाही आणि जिल्हा शल्यचिकित्सक देखील फक्त लोकांनी आणून टाकले एवढेच सांगत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य विभागात झालेला हा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी आमदार लोणीकर यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेला भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस, प्राध्यापक सदानंद मोरे, शिवराज नारियलवाले यांची उपस्थिती होती.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button