फसवणूक प्रकरणी मिशन हॉस्पिटल वर गुन्हा दाखल; हे अधिकार पोलिसांना नाहीत डॉ. मोजेस
जालना -महात्मा फुले जन आरोग्य योजने कडून रुग्णाचेेेे बिल मिळाले असतानादेखील मिशन हॉस्पिटलने रुग्णाकडून बिल वसूल केलेआणि फसवणूक केली. याप्रकरणी सदर बाजार पोोलिस ठाण्यात मिशन हॉस्पिटलचे डॉ. ख्रिस्तोफर मोजस आणि व्यवस्थाप डेव्हिड गायकवाड यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान हेेे अधिकार पोलिसांना नसल्याचा निर्वाळा डॉ. मोजेस यांनी दिला आहे.
*हे आहे प्रकरण*
अजितदादा कोठारी यांच्या पत्नीला मुतखड्याचा त्रास होता. आणि त्यासाठी त्यांनी दिनांक 29 एप्रिल 2020 रोजी मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. दिनांक 21 मे पर्यंत त्यांचे हे उपचार सुरू होते. यादरम्यान रुग्णालयातील आणि बाहेेरच्या औषधी खर्च असा एकूण 17 हजार 764 रुपये रुग्णालयाने नगदी भरून घेतले. त्यानंतर महात्मा फुले जन आरोग्य योजने कडून देखील त्यांना 24 हजार रुपये मंजूर झाले. मात्र हॉस्पिटलने त्यांचे बिल परत केले नाही .या आरोपावरून हॉस्पिटलनेेे रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
* पोलिसांना अधिकारच नाही*
दरम्यान याा संदर्भात आरोपी असलेले डॉ. मोजस यांनी सांगितले की अशा प्रकारचाा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. एवढ्या रात्री गुन्हा दाखल करण्यासारखे यामध्ये काय आहे? केवळ शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टीचे पाहून हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना कसा त्रास होईल या उद्देशाने हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खरेतर पोलिसांना असा अधिकार नाही. यासंदर्भात पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची यासंदर्भात भेट घेतली आहे. आणि कायदा मधील तरतुदी विषयी त्यांना माहिती दिली ,त्या अनुषंगाने त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांना तशा सूचन सूचना देऊन असेेेे गुन्हे दाखल करून घेण्यापूर्वी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा शल्य्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करावी असं सांगितलं आहे.
ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा edtv jalna app