बाल विश्व

पॅन इंडिया डायल वन वन टू: वाहनांच्या वितरण सोहळ्याचे विहंगम दृश्य

जालना -पॅन इंडिया अंतर्गत आता पोलीस प्रशासनामध्ये नवीन यंत्रणा सुरू झाली आहे. सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी आता 100 ऐवजी 112 हा नंबर डायल करावा लागणार आहे .हा नंबर डायल केल्यानंतर थेट राज्याच्या मुख्यालयाशी जोडला जाईल आणि तेथून संबंधित पोलिसांकडे माहिती पुरवली जाणार आहे. त्यामुळे गरजूंसाठी तातडीने मदत ही मिळणार आहे. कॉल ट्रॅकर द्वारे गरजू व्यक्ती कुठे उपस्थित आहे हेही लवकर समजणार आहे.

जालना पोलीस दलाला 92 दुचाकी आणि वीस चार चाकी नव्याकोऱ्या गाड्यांचे लोकार्पण आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्याला आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल पोलीस अधीक्षक विनायक देशमुख आदींची उपस्थिती होती.

*ताज्या आणि विशेष बातम्या पाहण्यासाठी प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा edtv jalna app*

Related Articles