बाल विश्व

पावसाने आकणी गावात जाणारा  पूल खचला; ग्रामस्थांचा तालुक्याशी संपर्क तुटला,


मंंठा -तालुक्यातील मंठा जालना रोड पासून अंदाजे पाच की.मी.अंतरावर असलेले आकणी गावात जाणाऱ्या रस्त्यावरील पूल खचल्याने ग्रामस्थांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. गावकऱ्यांना गावाच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे.सदरील पुलाचे काम पाटबंधारे विभाग अंतर्गत झाले होते.कामात वापरण्यात आलेल्या सिमेंट पाईप याचा व्यास कमी असल्याने पुराचे पाणी त्या पाईप मधून जाऊ शकले नाही.त्यामुळे पुराचे पाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन शेत पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

विशेष म्हणजे गावाला जोडला जाणार अकणी ते हिवरखेड रस्त्याच्या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने गाव बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत.अकणी पाटी ते गाव रस्ता केवळ पाच की.मी.अंतरचा असताना या कामाला प्रत्यक्षात सरुवात सा.सन.2007 मध्ये करण्यात आली.  परंतु आत्तापर्यंत   हा रस्ता तयार झालेला नाही. चार कोटी रुपये बजेट असलेला हा रस्ता पूर्ण करण्यास 14 वर्षापेक्षा वर्षा पेक्षा आधिक काळ झाला आहे. मागील आठवड्यात झालेल्या  हा पावसाने पूल जागा सोडत असल्याने गावकऱ्यांनी या बाबत तहसीलदार व पाटबंधारे विभागास एक जुलैला  लेखी निवेदन देखील दिले होते.त्या नुसार तलाठी मार्फत पचंनामा देखील करण्यात आला होता.
सदरील पूल खचला असल्याने ग्रामस्थांना अडचण येऊ शकते व झालेल्या शेती पिकाची नुकसान भरपाई देण्याची विनंती सबंधित विभागास कळवून देखील या बाबत कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली  नसल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सागितले.पुलाचे काम तात्काळ न झाल्यास ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे या वेळी प्रतिनिधीशी बोलताना सागितले.
———————————————————
पाटबंधारे विभागाकडून मागील 14 वर्षापासून आकणी पाटी ते माकणी गाव रस्त्याचे काम सुरू असून खडीकरण,डांबरीकरण व मजबुतीकरण करणे तसेच या रस्त्यावर असलेले तीन पुलाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. जे काही थोड्याफार प्रमाणातकाम झाले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून अकणी  ग्रामस्थांवर अन्याय करणारे आहे. चार किलोमीटर रस्ता 14 वर्षे झाली तरी देखील पाटबंधारे विभाग पूर्ण करू शकलेला नाही. त्यामुळे संबंधित खात्यातील अभियंते अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी  मागणी माजी सरपंच सोनाजीराव बोराडे यांनी यांनी केली आहे.

  • ताज्या व अपडेट बातम्यांसाठी प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा edtv jalna app
दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button