आनंदी स्वामी महाराजांच्या पालखीला परवानगी
जालना- प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या श्री आनंदी स्वामी महाराज यांच्या पालखी मिरवणुकीला अखेर परवानगी मिळाली आहे .पहाटे तीन ते पाच या वेळेत 12 सेवेकरांच्या उपस्थितीमध्ये प्रशासनाने या पालखी मिरवणुकीला परवानगी दिली आहे. दरम्यान आज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत लोंढेवाडी येथील भजनी मंडळी च्या भजन संधेचा कार्यक्रम पार पडला. ह. भ .प .विष्णु महाराज बारड, प्रकाश महाराज उमरे, दत्तात्रय उमरे हे गायक म्हणून तर पखवाज वर गोपाळ पवार, पेटीवर श्री. खापरे, कृष्णा खोत, यांनी साथ दिली. दिपक रणनवरे भागवान साबळे आदी वारकरी देखील यावेळी उपस्थित होते.
श्री आनंदी स्वामी संस्थानच्या वतीने पालखी मिरवणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती .त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. परवानगी देताना पंढरपूरच्या धर्तीवर देण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे की 10 मानाच्या पालख्या मर्यादित स्वरूपात विहित अटी व शर्तीवर पंढरपूर येथे जाण्यास परवानगी दिली आहे त्याच धर्तीवर जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री आनंदी स्वामी महाराज यांची अडीचशे वर्षांची परंपरा आहे हे लक्षात घेऊन 12 सेवेकरांच्या मर्यादेमध्ये पहाटे तीन ते पाच वेळेस दरम्यान पालखी मिरवणुकीला परवानगी देण्यात येत आहे .मिरवणूक कुठेही थांबू नये, आणि भाविकांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.कोरोनाचे नियम व अटी पाळाव्यात. दरम्यान मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने वाहनांमध्ये पारंपारिक मार्गाने ही मिरवणूक निघणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा edtv jalna app