चार गावच्या ग्रामस्थांचा एकत्रित रास्तारोको
मंठा – चार गावच्या ग्रामस्थांनी एकत्र येत बृहत लघु प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करावे या मागणीसाठी करावे या मागणीसाठी चार गावच्या ग्रामस्थांनी एकत्रित येत आज रास्ता रोको केला. मंठा तालुक्यातील बरबडा ,आकणी, हिवरखेडा व केंधळी या चार गावच्या ग्रामस्थांचा यामध्ये समावेश होता .गोपाळराव बोराडे आणि कल्याण बोराडे यांनी या रास्तारको चे नेतृत्व केले.
मंठा तालुक्यातील बरबडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून ब्हत लघु प्रकल्पाचे काम सुरू आहे, मात्र ते अद्याप पर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हा प्रकल्प मूळ अंदाज पत्रकाप्रमाणे लवकर पूर्ण करावा, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा चे काम तातडीने पूर्ण करून घराचा मोबदला देण्यात यावा, प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे त्या कंत्राटदाराला दंड लावून त्याच्याकडून चांगले काम करून घेण्यात यावे. या आणि अन्य मागण्यांसाठी हा रस्ता रोको करण्यात आला होता.
ताज्या बातम्या पहाण्यासाठी डाउनलोड करा edtv jalna app.