मराठवाडा

ओढा एकीकडे आणि पूल दुसरीकडे: सिंचन विभागाचा अजब कारभार

मंठा-प्रशासकीय यंत्रणेमध्ये नवनवीन प्रयोग नेहमीच पाहायला मिळतात. त्या मधीलच एक नवीन प्रयोग मंठा तालुक्यातील आकणी गावाजवळ पाहायला मिळाला. सिंचन विभागाने या गावात जाणारा जुना पूल तोडून नवीन पूल बांधला आहे. आणि हा नवीन पूल दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसा मध्ये पूर्ण वाहून गेला. त्यामुळे परिसरातील शेती पिकाचे नुकसान तर झालेच मात्र या गावचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे उद्या आपत्ती आलीच तर त्याला तोंड द्यायचे कसे ?या विवंचनेत गावकरी आहेत, आणि त्यांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सिंचन विभागाच्या वतीने हा पूल बांधण्यात आला आहे. ओढ्याच्या मधोमध हा पूल एका बाजूनेच बांधण्यात आल्यामुळे आणि पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक असणारे सिमेंटच्या पाईप चा आकार लहान आहे त्यामुळे या पुला खाालुुन फारसे पाणी वाहून जात नाही. पर्यायाने हे पाणी वाहून  न गेल्यामुळे परिसरातील शेतीमध्ये हे पाणी गेले आणि शेतीचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर या पाण्याच्या जोरामुळे फुल देखील पूर्णपणे वाहून गेला आहे. यामुळे या विभागाचे पितळ उघडे पडले आहे. कारण पूल बांधत असताना नाल्याच्या दोन्ही बाजूला सारखे अंतर ठेवून तो बांधायला हवा मात्र या पुलाची सुरुवातच नाल्याच्या मध्यभागातून करून एकाच बाजूला बांधण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूने पाण्याने  हा पूल पूर्ण वाहून गेला  आहे. सद्य परिस्थितीमध्ये वाहने तर सोडाच पायी जाणे देखील धोक्याचे झाले आहे .शेतात काम करण्यास शेतकरी महिला, शहरी भागात येणारे गरजू ग्रामस्थ, यांना या ओढ्यातून चालत जाण्याची वेळ आली आहे .तुर्तास पाणी नाही म्हणून ते शक्यही आहे मात्र भविष्यात पाऊस पडल्यानंतर या ओढ्यातून पुन्हा पाणी    वाहायला    सुुरुवात होईल आणि मोठी दुर्घटना होऊ शकते .या सर्व बाबींमुळे ग्रामस्थ चांगलेच संतापले आहेत. याचाच एक भाग म्हणून आज जालना परभणी महामार्गावर आकणी पाटीवर रास्ता रोको करण्यात आला होता .या फुलाची लवकरच दुरुस्ती नाही केली तर मोठी किंमत गावकऱ्यांना आणि सरकारला चुकवावी लागणार आहे.

*ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा edtv jalna app*

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button