आकड्यांचे गणित मोडीत काढणारा लघुपट “आकडे”
जालना- आयुष्यात आकड्यांचेच गणित सर्व कांही नाही ,हे गणित मोडीत काढून देखील उंच भरारी घेता येते. हे वास्तव दर्शवणारा “आकडे” हा लघुपट दिनांक 20 जुलै रोजी युट्यूब वर प्रदर्शित झाला आहे. छत्रपती फिल्म जालना या बॅनरखाली अजिंक्य काकडे या तरुणाने हे धाडस केले आहे.
वास्तववादी असलेल्या “आकडे “या लघुपटामध्ये पालक आणि पाल्य या दोघांमध्ये या आकड्याच्या गणितावरून होणारे वाद आणि त्यामधून वाढणारा तणाव हे वास्तव दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र आकड्यांचे गणित सर्व काही नाही ,त्यापलीकडे देखील विश्व आहे. त्यामुळे आकड्याच्या नादी न लागता,समाज काय म्हणेल या कडे लक्ष न देता आपण आपले वेगळे विश्व निर्माण करावे ,हा संदेश या लघुपटाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये दहा-पंधरा कलाकारांना सोबत घेऊन यूट्यूब चैनल वर अर्ध्या तासाचे आकड्यांच हे गणित जुळविण्यात अजिंक्यराज काकडे यांना तारेवरची कसरत करावी लागली आहे. जालन्यातील ज्येष्ठ कलावंत मुकुंद दुसे यांचे” वेडा बाबा” हे पात्र या लघुपटात परीक्षकांना आकर्षित करणारा आहे.
*ताज्या घडामोडी पहाण्यासाठी डाऊनलोड करा edtv jalna app*