ओबीसी समाजाच्या विभागीय मेळाव्यात वीस ठराव पारित
जालना -ओबीसी समाजाचा मराठवाडा विभागीय मेळावा जालना येथे आयोजित करण्यात आला होता .या मेळाव्यामध्ये सुमारे वीस ठराव पारित करण्यात आले .
येथील पाठक मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मराठवाडा विभागीय मेळावा असल्यामुळे जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध भागातून नेत्यांची यावेळी उपस्थिती होती . माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, ऍड. काळबांडे, बाबुराव मामा सतकर, नारायणराव चाळगे, रेणुका भावसार, विठ्ठलसिंग राजपूत, सुहास मुंडे, आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
महत्त्वाच्या ठरावा मध्ये, जोपर्यंत ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी विधानसभेने एकमताने ठराव पारित करून केंद्राकडे पाठवावा, संत गाडगे बाबांच्या नावाने बारा बलुतेदार यांचे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.नीट, यूजी, पीजी, मध्ये 27 टक्के आरक्षण देण्यात यावे या आणि अन्य ठरावांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान समाजाच्या मागण्या त्वरित मंजूर न झाल्यास लवकरच औरंगाबाद येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सूतोवाचं देखील या मेळाव्यात करण्यात आले.
*ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा edtv jalna app