लाईन ब्लॉक मुळे काही रेल्वे रद्द; तर काही उशिरा धावणार
जालना-जालना ते बदनापूर सेक्शन मधील दिनेगाव रेल्वे स्थानकावर दिनांक 25 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान15 दिवस दुपारी 3.30 ते 6.30 वाजे पर्यंत रोज 3 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे तो पुढील प्रमाणे
1- गाडी संख्या 07619 नांदेड ते औरंगाबाद साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 30 जुलै ते 06 ऑगस्ट दरम्यान पूर्णतः रद्द करण्यात येत आहे.
2- गाडी संख्या 07050 औरंगाबाद ते हैदराबाद विशेष गाडी दिनांक 25 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून रोज 125 मिनिटे उशिरा सुटेल. म्हणजेच तिची नियमित वेळ दुपारी 4.15 वाजता सुटण्या ऐवजी या कालावधीत औरंगाबाद येथून सायंकाळी 6.20 वाजता सुटेल.
3- गाडी संख्या 07653 हैदराबाद ते पूर्णां विशेष गाडी दिनांक 26 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान हैदराबाद येथून 90 मिनिटे उशिरा म्हणजेच तिची नीयमित वेळ सकाळी 8.20 वाजता ऐवजी 9.30 वाजता सुटेल.