Advertisment
राज्य

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता किसान रथ

जालना- केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी  कल्याण मंत्रालयाने देशातील शेतकरी, व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपन्या इत्यादी घटकांच्या शेतीमालाच्या वाहतुकीस मदत होण्यासाठी किसान रथ हे मोबाईल ॲप कार्यरत केले आहे.

              किसान रथ मोबाईल ॲपच्या माध्यमातुन वाहतुकदार संघटना तसेच वैयक्तिक वाहतुकदार यांच्याकडुन शेतीमालाच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टर यांची उपलब्धता  होत आहे. शेतक-यांच्या व व्यापा-यांच्या शेतमालाची मार्केट, गोडावुन, रेल्वे स्टेशन, विमानतळ इत्यादी ठिकाणी वाहतुकीसाठी वाहनांची उपलब्धता होणेसाठी या ॲपची मदत होईल. सध्याच्या कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या परिस्थितीत हे किसान रथ ॲप शेतमालाच्या  वाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचा दावा शासनाने केला आहे.

      शेतकरी, व्यापारी, शेतकरी साहित्य उत्पादक कंपन्या तसेच वाहतुकदार इत्यादींनी या किसान रथ ॲप प्ले स्टोअर व ॲप स्टोअर वरुन डाऊनलोड करुन, या ॲपवर नोंदणी करुन, शेतमालाच्या वाहतुकीसाठी या ॲपचा जास्तीत जास्त वापर वाढविणे बाबत केंद्र शासनाने सुचित केले आहे. स्थानिक वाहतुकदार या मोबाईल ॲपवर नोंदणी  करणेसाठी व अधिकच्या माहितीसाठी नजिकच्या बाजार समित्यांशी संपकर्म करु शकतात.

       केंद्र शासनाने कळविल्याप्रमाणे शेतमालाच्या  वाहतुकीसाठी 5 लाखाचे वर ट्रक व 20 हजारचे वर ट्रॅक्टर  या ॲपवरील वाहतुकदारद्वारे नोंदविले असुन वाहतुकीसाठी वाजवी किंमतीत उपलब्ध होऊ शकतात राज्यातील 11 हजार 927 ट्रक, 220 वाहतुकदार, 340 ट्रॅक्टर, 10 हजार ट्रेंडर, 318 शेतकरी उत्पादक कंपन्या व 250 बाजार समित्यांनी या किसान रथ ॲपवर नोंदणी केली आहे.

      जिल्ह्यातील शेतक-यांनी, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी, व्यापा-यांनी तसेच वाहतुकदारांनी या ॲपवर नोंदणी करुन शेतमालाच्या वाहतुकीसाठी किसान रथ या ॲपचा वापर करून जिल्ह्यातील जवळच्या बाजार समित्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना यांनी केले आहे.

*ताज्या आणि परिपूर्ण बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtv jalna app.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button