राज्य

मित्राच्या लग्ना साठी जाणाऱ्या स्कार्पिओ गाडी ला अपघात; पाच जण जखमी

वडिगोदरी-

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पाच तरुण आपल्या मित्राच्या लग्नासाठी गेवराई कडून जालना येथे जात होते .त्यांच्या स्कार्पिओ गाडीचा अपघात होऊन पाच तरुण जखमी झाले.यातील तीन जण तरुण गंभीर जखमी झाले असून दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात स्कार्पिओ चालक बलंबाल बचावला.


अंबड तालुक्यातील झिर्पि फाटा येथे ही घटना घडली. स्कार्पिओ एम.एच.१६ सि. क्यू.२२४६ ही एका वाहनास ओव्हरटेक करतांना समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने ही गाडी महामार्गाच्या खाली पंधरा ते वीस फूट खोल शेतात पलटी झाली. स्कार्पिओ चालक हरिभाऊ विठ्ठल झाम्बरे यांना या भीषण अपघात काहीच झाले नाही. हे दैव बलवत्तर म्हणून यादुर्घटनेत जीवित हानी झाली नाही.
यातील गंभीर जखमी पैकी महेश राजकुमार घोरतळे (२७) हे फ्रॅक्चर असून त्यांना अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अक्षय बबन भोसले (२४) जिल्हा रुग्णालय जालना जेथे उपचार घेत आहे.तर नौशाद मणियार ( २६) शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
किरकोळ जखमी असलेल्या जखमींवर अंबड ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी पाठवून दिले.

*ताज्या आणि परिपूर्ण बातम्या पाहण्यासाठी प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा edtv jalna app

 

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button