जालना जिल्हा

पहिली पास वडिलांची मुलगी होणार डॉक्टर :पी. एफ सी. मध्ये केलं मार्गदर्शन

जालना-वडील पहिली पास, घरी पाच एकर शेती आणि पाच जणांची उपजीविका अशा परिस्थितीमध्ये पाचवी पर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि त्यानंतर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या रंजना मदन वैद्य या विद्यार्थिनीने डॉक्टर होण्याच्या दिशेने झेप घेतली आहे. जे. जे. कॉलेज ऑफ मेडिकल मुंबई. इथे तिचा एम. बी. बी. एस. साठी प्रवेश निश्चित झाला आहे. तिच्या यशाचे गमक समजावून घेण्यासाठी येथील पी. एफ.सी.अर्थात पाटील फाउंडेशन सेंटर येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी डॉ. नीलेश देशमुख आणि डॉ. शिवदास मिरकड यांनीही मार्गदर्शन केले.           त्यावेळी बोलताना रंजना म्हणाली” माझ्यासारख्या साधारण कुटुंबातील मुलगी पालकांच्या पाठबळामुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे डॉक्टर होऊ शकते तर तुम्ही का नाही होऊ शकत? असे म्हणत उच्च शिक्षणासाठी तिने शुभेच्छाही दिल्या अंबड तालुक्यातील रोहिलागड येथे राहणारी ग्रामीण भागातील रंजना वैद्य हीने पहिली ते पाचवी शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेऊन 6 वी ते 12 वी पर्यंत नवोदय विद्यालयात शिक्षण घेतले आणि वैद्यकीय क्षेत्राची पूर्वतयारी पुणे येथे एक वर्ष केली 2020 मध्ये दिलेल्या नीट परीक्षेत तिने महाराष्ट्र राज्यातून 694 तर भारतामधून 9627 रँक मिळविली आहे. पी. एफ .सी. मधील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाविषयी प्रोत्साहन देण्यासाठी आणि अभ्यासाची पद्धत समजावून घेण्यासाठी रंजनाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याच निमित्ताने शहरातील डॉ. निलेश देशमुख आणि डॉ. सदाशिव मिरकड यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .

यावेळी रंजना चे वडील मदन वैद्य यांच्यासह पी. एफ. सी. चे संस्थापक संचालक शिवाजी पाटील ,संचालक कृष्णा मस्के, कार्यकारी संचालक सचिन गिरी, मुंबईतील जे. जे. मेडिकल कॉलेजच्या रंजना जाधव अकॅडमिक डायरेक्टर नागेश पांडे, शिक्षिका अपराजिता अग्निहोत्री, यांच्या सह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*ताज्या आणि अपडेट बातम्या पहाण्यासाठी डाउनलोड करा edtv jalna app.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button