Advertisment
जालना जिल्हा

लाच देणे हा देखील गुन्हा: अभियंता जाळ्यात

जालना -लाच घेणे जसा गुन्हा आहे, तसाच लाच देणे हा देखील गुन्हाच आहे. दोघांनाही भारतीय दंड विधानात शिक्षेचे एकच कलम लागते .मात्र लाच देणारे आरोपी हे क्वचितच आढळतात त्यामुळे अनेकांना लाच घेणे हा एकच गुन्हा असल्याचे माहीत आहे.

जालना पंचायत समितीच्या शाखा अभियंता आणि कंत्राटदाराने तक्रारदाराला लाच देण्याचा प्रयत्न केला.  लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या अभियंत्यांसह कंत्राटदाराला आज रंगेहात पकडले.

जालना तालुक्यातील भिलपुरी गावाला खासदार निधीतून दहा लाख रुपयांचे काम मंजूर झाले आहे .जिल्हा परिषद अंतर्गत गावठाण रस्ता व स्मशानभूमी बांधकामासाठी हा निधी मिळाला आहे. या कामाचे कंत्राट काशिनाथ चव्हाण आणि त्यांच्या मित्रांनी घेतले होते. त्यानुसार अर्धे काम झाल्यावर मोजमाप पुस्तिके नुसार ग्रामपंचायत च्या खात्यामध्ये चार लाख 73 हजार रुपये जमा झाले आणि धनादेशाच्या  बदल्यात तीन टक्के रक्कम म्हणजे पंधरा हजार रुपये आणि या कामाचे ऑडिट करण्यासाठी चार हजार रुपये असे एकूण 19 हजार रुपये पंचायत समितीचे शाखा अभियंता देविदास भिकाजी ठोके पाटील 56 ,राहणार कांचन नगर जालना आणि कंत्राटदार काशिनाथ चव्हाण राहणार काकडा, या दोघांनी तक्रारदाराला देण्यासाठी मंठा चौफुलीजवळील d-mart येथे बोलावल. परंतु तक्रारदाराची लाच घेण्याची इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची संपर्क केला आणि आज दिनांक 30 रोजी शाखा अभियंता देविदास भिकाजी ठोके पाटील आणि कंत्राटदार काशिनाथ चव्हाण या दोघांना लाच देण्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले तालुका जालना पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

*ता

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button